'बिग बॉस हिंदी'च्या नव्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस १७'मध्ये या रिएलिटी शोचं स्वरुप पूर्णपणे बदलण्यात आलं आहे. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय कलाकारांनी एन्ट्री घेतली आहे. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीदेखील आहे. नुकतेच कार्यक्रमाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये मुनव्वर हा आपल्या वडिलांबद्दल बोलताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
विक्की जैनशी बोलत असताना मुनावर फारुकी त्याच्या दिवंगत वडिलांच्या आठवणीने भावूक झाला. तो म्हणतो, 2018 मध्ये माझं कुटुंब बिग बॉस कार्यक्रम पाहायचे. मी या शोमध्ये जावं अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. आता राहिले नाहीत आणि मी येथपर्यंत पोहचलो आहे. आज ज्या ठिकाणी मी आहे. तिथपर्यंत पोहचण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला आहे'. वडिल आणि आपल्या प्रवासाबद्दल बोलताना तो आपले अश्रू थांबवू शकला नाही.