लोकप्रिय टीव्ही रिॲलिटी शो बिग बॉसचा 17 वा सीझन चांगलाच गाजला. मुनावर फारूकीने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. बिग बॉस 17 संपल्यावरही शोची खुप चर्चा आहे. बिग बॉस 17 मधील स्पर्धकांची रियुनियन पार्टी रंगली. या पार्टीत अरबाज खान पत्नी शूरासोबत सहभागी होता. याच पार्टीत बिग बॉस 17 चे सर्व स्पर्धक सहभागी झाले होते. त्यावेळी अभिषेक कुमार आणि सनी उर्फ तहलकामध्ये ंमोठा राडा झाला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. काय घडलं नेमकंं?
बिग बॉस 17 च्या पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पार्टीत, प्रसिद्ध YouTuber सनी आर्य उर्फ तहलका आणि अभिषेक कुमार यांच्यात पुन्हा एकदा भांडण झालेले दिसले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तहलका बिग बॉस फेम अरुण मशेट्टीसोबत पार्टी एन्जॉय करत आहे. दरम्यान, अचानक त्याने खुर्ची उचलली आणि अभिषेकला मारायला पुढे आला.
तहलकाला पाहून अभिषेक हात जोडून उभा राहतो. मग अरुण मशेट्टी धावून तहलकाला थांबवतो. पण पुढच्याच सेकंदात तहलका अभिषेकला प्रेमाने मिठी मारते. मग अचानक वातावरण बदलते आणि सगळे हसायला लागतात. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे. खरंतर व्हिडिओत जे दिसतंय तो फक्त एक विनोद होता. बिग बॉस 17 निमित्ताने तहलका आणि अभिषेक कुमार यांच्यात मोठा वाद झाला होता. त्यामुळे तहलकाला शोमधून बाहेर काढण्यात आले.