Join us

Ankita Lokhande : "तेव्हा मी खूप रडली, त्याने कधीच मला...."; अंकिताला आली सुशांतची आठवण, सांगितलं सीक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 13:02 IST

Ankita Lokhande And Sushant Singh Rajput : पुन्हा एकदा अंकिताने स्वतःबद्दल आणि सुशांतबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. सुशांतने तिला सात वर्षांच्या नात्यात कसं ठेवलं हे अभिनेत्रीने सांगितलं. 

अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या बिग बॉसच्या घरात आहे. 'बिग बॉस'च्या घरात अंकिता ज्या व्यक्तीबाबत बोलल्यामुळे सर्वाधिक चर्चेत असते तो म्हणजे सुशांत सिंह राजपूत. या शोमध्ये अभिनेत्रीने एक्स बॉयफ्रेंड सुशांतबद्दल अनेकदा भाष्य केलं आहे. पुन्हा एकदा अंकिताने स्वतःबद्दल आणि सुशांतबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. सुशांतने तिला सात वर्षांच्या नात्यात कसं ठेवलं हे अभिनेत्रीने सांगितलं. 

एका एपिसोडमध्ये अंकिता अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय यांच्याशी संवाद साधत होती. त्यावेळी तिने सुशांत कसा होता हे सांगितलं. "जेव्हा सुशांतचा पहिला चित्रपट 'काई पो चे' रिलीज झाला होता. त्यावेळी मी खूप रडले होते... मला खूप अभिमान वाटत होता. या चित्रपटासाठी सुशांतने खूप मेहनत घेतली आहे" असं अंकिताने सांगितलं. 

"सुशांतचा एमएस धोनी 2 वर्षांसाठी पोस्टपोन केला होता. या दोन वर्षांत त्याने खूप मेहनत केली. आम्ही रात्रभर पार्टी करायचो, मी झोपायला जायचे पण तो सकाळी 6 वाजल्यापासूनच क्रिकेट खेळायला जायचा. तो 2 वर्षे खूप क्रिकेट खेळला. तो खूप जास्त मेहनती होता."

"आम्ही सात वर्षे एकत्र होतो. पण या 7 वर्षांत त्याने कधीही मला चुकीच्या पद्धतीने वागवलं नाही. त्याने कधीही माझ्याशी गैरवर्तन केलं नाही. आमच्यात भांडणं व्हायची पण कधीच आमच्यात फार मोठी भांडणं होत नव्हती" असं सुशांतसोबतच्या नात्याबद्दल अंकिताने म्हटलं आहे.  

टॅग्स :अंकिता लोखंडेसुशांत सिंग रजपूत