Join us

अभिषेक इज बॅक! आधी हकालपट्टी, पुन्हा दिला प्रवेश; नेमकं काय घडलं बिग बॉसच्या घरात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 15:00 IST

 'बिग बॉस 17'मध्ये अभिषेक कुमारची पुन्हा एकदा एन्ट्री झाली आहे

 'बिग बॉस 17'  हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या पर्वात कधी काय धमाका होईल हे कोणीही सांगू शकत नाही. आता एक मोठे अपडेट समोर आले आहे.  'बिग बॉस 17'मध्ये अभिषेक कुमारची पुन्हा एकदा एन्ट्री झाली आहे. अभिषेक परत बिग बॉसमध्ये आल्याने त्याचे चाहते मात्र आनंदी झाले आहेत. 

नुकतेच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अभिषेकच्या री-एन्ट्रीची झलक पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये दिसते की, सलमानने ईशा मालवीय व तिचा बॉयफ्रेंड समर्थ जुरेलची आभिषेकच्या मानसिक आरोग्याची खिल्ली उडवल्याबद्दल फटकारले आणि अभिषेकला एक संधी देण्याचा निर्णय घेतला. प्रोमोमध्ये दिसते की,  सलमान खान कन्फेशन रूममध्ये बसलेल्या अभिषेकला शिट्टी वाजवून घरात बोलवतो.

'बिग बॉस 17'च्या घरात अभिषेक कुमार आणि समर्थ जुरैल यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. मानसिक स्वास्थावरून ईशा आणि समर्थने अभिषेकची खिल्ली उडवली होती. यानंतर हे हे भांडण फक्त शाब्दिक राहिलं नाही तर अभिषेकने थेट समर्थच्या कानशिलात लगावली. यानंतर अंकिताने आपल्या आधिकारांचा वापर अभिषेक कुमारची 'बिग बॉस 17' मधून हकालपट्टी केली होती.

अभिषेकच्या हकालपट्टीनंतर त्याच्या चाहत्यांनी आणि अनेक कलाकारांनी अभिषेकला पाठिंबा दिला होता. काम्या पंजाबी, रितेश देशमुख, प्रिन्स नरुला यांसारख्या सेलिब्रिटींनी अभिषेकचं समर्थन केलं होतं. तर चाहत्यांनी त्याला शोमध्ये परत घेण्याची मागणी केली होती. बिग बॉसमधून बाहेर काढल्यानंतर पुन्हा एकदा प्रवेश देण्याची ही घटना बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे. 

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटीटिव्ही कलाकारसलमान खान