छोट्या पडद्यावर अलिकडेच बिग बॉसचं १७ वं पर्व सुरु झालं आहे. हे पर्व सुरु झाल्यापासून ते वेगवेगळ्या कारणामुळे ते चर्चेत येत आहे. यात खासकरुन अभिनेत्री अंकिता लोखंडे (ankita lokhande) आणि विकी जैन (vicky jain) ही जोडी प्रेक्षकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. एकीकडे अंकिता आणि विकीमध्ये सतत वादविवाद होत आहेत. तर, दुसरीकडे या जोडीला मिळत असलेल्या सोईसुविधांमुळे घरातील अन्य सदस्य नाराज झाले आहेत. यामध्येच आता बिग बॉसच्या घरातील स्पर्धक नील भट्ट याने विकी जैनची पोलखोल केली आहे.
विकी जैन या शोमध्ये सहभागी झाल्यापासून अंकितापेक्षा त्याच्याच नावाची जास्त चर्चा रंगल्याचं दिसून येत आहे. कधी त्याच्या अतरंगी वागण्यामुळे तर कधी त्याचं आणि अंकिताचं होणारं भांडण यामुळे तो सतत चर्चेत येत असतो. इतंकच नाही तर त्याच्या स्टाइल स्टेटमेंटचीही चर्चा होतांना दिसते. परंतु, त्याच्या लूकविषयी नीलने एक खुलासा केला आहे. विकी जैन खोटे केस लावतो असं नीलने म्हटलं आहे ज्यामुळे घरातले सगळेच जण थक्क झाले आहेत.
मागच्या एपिसोडमध्ये बिग बॉसने अंकिता आणि विकी जैनला एक स्पेशल सर्व्हिस दिली. ज्यानंतर घरातल्या अन्य सदस्यांना बिग बॉसच्या या निर्णयाचा विरोध केला. ज्यानंतर सगळ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. यामध्येच नीलने विकीची पोलखोल केली. विकी मेडिकल रुममधून बाहेर आल्यानंतर तहलकाने नोटीस केलं की, विकीचे केस कापले आहेत, त्याची दाढी सेट झालेली आहे. त्याचा हा लूक पाहून तहलका आणि अरुण यांनी बिग बॉसवर आगपाखड केली. सोबतच मनार चोप्रानेही अंकिताला मेडिकल रुममध्ये हेअर स्पा दिल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे हे सत्य समोर आल्यानंतर तहलका, अरुण आणि मनारा यांनीही बिग बॉस समोर काही अटी ठेवल्या.
नीलने केली विकीची पोलखोल
या सगळ्या वादविवादामध्ये नीलने उडी घेतली आहे. विकीचे केस खोटे आहेत असं त्याने सांगितलं. "विकीला हेअरलाइन आणि टकलेपणाची समस्या आहे त्यामुळे तो विग लावतो. आठवड्यातून एकदा त्याला मेडिकल ग्लू ने विग चिटकवावा लागतो. कदाचित या शो मध्ये येण्यापूर्वी त्याने ही गोष्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिली होती. त्यामुळेच बिग बॉसकडून त्याला ही स्पेशल सर्व्हिस मिळत आहे", असं नील म्हणाला.
दरम्यान, बिग बॉसने अंकिता-विकीला दिलेल्या स्पेशल सर्व्हिसमुळे घरातील सदस्य नाराज झाले. ज्यामुळे बिग बॉसने या सर्व्हिसविषयीचा निर्णय घरातल्यांवर सोपवला. जोपर्यंत अंकिता-विकीला मिळणाऱ्या सर्व्हिससाठी घरातले तयार होत नाहीत तोपर्यंत या जोडीला स्पेशल सर्व्हिस मिळणार नाही.