Join us

'अंकिता लोखंडेचा पती हीच माझी ओळख...' विकी जैनने बिग बॉसमध्ये व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 12:29 PM

माझीच लोकं मला अंकिताचा पती म्हणत आहेत...विकी जैनने अंकितासमोरच व्यक्त केली नाराजी

टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो बिग बॉस (Bigg Boss 17) मध्ये रोज काही ना काही नवीन घडामोडी घडत आहेत. शोमध्ये विकी जैन (Vicky Jain) आणि अंकिता लोखंडेची (Ankita Lokhande) जोडी सुरुवातीपासूनच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिली आहे. दोघांमध्ये घरात आल्यापासून सतत वाद विवादही होत आहेत. १९ नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये पुन्हा दोघांची एका मुद्द्यावर चर्चा झालेली दिसते. यामध्ये विकी जैनने स्वत:ची काही ओळखच नाही असं म्हणत खंत व्यक्त केली आहे.

गेल्या एपिसोडमध्ये विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यात काही वाद झालेले दिसत आहेत. अंकिता गार्डन एरियात बसलेली आहे तेव्हा तिथे विकी जैनही येऊन बसतो. तेव्हा अंकिता त्याला दूर जायला सांगते कारण तिला एकटं बसायचं असतं. तुझी इच्छा असेल तेव्हा बोल मी इथेच बसून राहतो असं विकी तिला म्हणतो. काही वेळाने अंकिता म्हणते की तू माझी तुलना सनाशी करतोस. तेव्हा विकी म्हणतो हे मध्येच कुठून आलं?

अंकिता म्हणते, 'तू एक ज्ञानी बाबा वाटतोस जे एकदम फेक आहे. माझी सनासोबत तुलना करतो जे टीव्हीवर बघायला चांगलं वाटतं. मी पण टीव्हीवर आहे, माझा खेळ खेळत आहे. पण इतकी स्पर्धा आहे की तुझ्या नजरेत मी नक्की कुठे हे मला माहित नाही. मला खेळायचं आहे पण मी स्वत:शीच स्पर्धा करत आहे.'

यावर विकी म्हणतो,'जेव्हापासून आपलं लग्न झालंय लोक मला अंकिता लोखंडेचा पती म्हणूनच ओळखतात. मी जगात कुठेही गेलो अगदी आपल्या जवळच्या माणसांकडेही गेलो तरी तेही मला हेच म्हणतात. माझीच लोकं, बिझनेस विश्वातील लोकं जे मला लहानपणासून माझ्या नावाने ओळखतात ते असं म्हणतात मला कसं वाटत असेल.'

टॅग्स :अंकिता लोखंडेबिग बॉसटिव्ही कलाकार