Join us

Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या घरात गश्मीर महाजनी एन्ट्री घेणार? खुलासा करत म्हणाला, “मी तीन वेळा...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 11:06 IST

Bigg Boss 17 : 'बिग बॉस'बद्दल गश्मीर महाजनीचा मोठा खुलासा, म्हणाला...

मराठीबरोबरच हिंदी कलाविश्व गाजवणारा अभिनेता गश्मीर महाजनी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गश्मीरने अनेक चित्रपट त्याबरोबरच वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील हँडसम हंक अशी ओळख मिळवणाऱ्या गश्मीरचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. गश्मीरने नुकतंच इन्स्टाग्रामवर #askme सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये त्याने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बिग बॉसबद्दल मोठा खुलासा केला आहे.

बिग बॉस हिंदी’चं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या पर्वात गश्मीर महाजनी सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत. एका चाहत्याने गश्मीरला ‘बिग बॉस १७’मध्ये सहभागी होणार का? असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना गश्मीरने बिग बॉसबद्दल खुलासा केला आहे. “मला बिग बॉसची ऑफर १७ वेळा नाकारता आली असती, तर त्यांच्या सीझन नंबरला आता मॅच करता आलं असतं. पण, मी आत्तापर्यंत फक्त तीन वेळा बिग बॉसची ऑफर नाकारली आहे,” असं उत्तर गश्मीरने दिलं आहे.

"माझ्या मुलीकडे पाहून त्याची लाळ गळत होती", अतिशा नाईक यांनी सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाल्या, "मी त्याला..." 

‘बिग बॉस हिंदी’च्या नव्या पर्वाबाबात प्रेक्षकही उत्सुक आहे. कपल विरुद्ध सिंगल अशी ‘बिग बॉस १७’ची थीम असणार आहे. या पर्वात मराठमोळी अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैनबबरोबर सहभागी होणार असल्याचीही चर्चा आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अंकिता आणि विकीला ‘बिग बॉस’च्या टीमकडून संपर्क साधण्यात आला आहे.

Exclusive: ‘गदर २’, अमिषा पटेलची नाराजी आणि संगीतकाराचे आरोप; दिग्दर्शक अनिल शर्मा यांची सडेतोड उत्तरं

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी आणि गश्मीर महाजनीचे वडील यांचं १५ जुलैला निधन झालं. राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला होता. ते कुटुंबीयांपासून वेगळे राहत होते. त्यांच्या निधनानंतर गश्मीर व कुटुंबीयांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

टॅग्स :गश्मिर महाजनीबिग बॉसरवींद्र महाजनीटिव्ही कलाकारमराठी अभिनेता