Join us

'बिग बॉस'च्या घरात गुणरत्न सदावर्तेंना सतावतेय पत्नीची आठवण, मोठ-मोठ्याने ओरडत म्हणाले, "जयश्री आय लव्ह यू"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 3:21 PM

'बिग बॉस मराठी'नंतर आता 'बिग बॉस' हिंदीच्या  १८व्या पर्वांची चर्चा सुरू आहे.

'बिग बॉस मराठी'नंतर आता 'बिग बॉस' हिंदीच्या  १८व्या पर्वांची चर्चा सुरू आहे. पहिल्या दिवसापासून या पर्वात फुल्ल ड्रामा पाहायला मिळत आहे. यात सहभागी झालेल्या एका स्पर्धकाने तर प्रक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ते म्हणजे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते.  सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आता गुणरत्न सदावर्ते यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ते पत्नी जयश्रीवर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसून येत आहेत. 

'बिग बॉस'च्या घरात गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. पण, घरापासून दूर असल्याने त्यांना पत्नी जयश्रीची आठवणही सतावतेय. जयश्रीबद्दल बोलताना ते म्हणाले,  "मला तिचा चेहरा पाहिल्यानंतर दुसरं कोणीही आवडत आहे. सगळेच छान दिसतात. पण, मला दोघा नवरा-बायको व्यतिरिक्त काहीही आवडत नाही. आम्ही दोघं खूप फिरतो, खूप भांडतो. कधी-कधी तर ती मला मला मारतेही. पण, त्याचं मला कधीही वाईट वाटतं नाही. थोड्या वेळात विचार करतो की तेव्हा  जयश्रीचं बरोबर असल्याचं कळतं. ती पण माझ्यासारखीच डॅशिंग आहे. मारामारी, जेल वगैरे सगळं काही करते. मी सर्वात जास्त तिच्यावर प्रेम करतो. जयश्री आय लव्ह यू", असे मोठ्याने म्हणत त्यांनी आपलं प्रेम जाहीर केलं. 

गुणरत्न सदावर्ते यांच्या मागे पत्नी जयश्री पाटील खंबीर उभ्या असतात. मराठा आरक्षण असो किंवा एसटी आंदोलन, सदावर्तेंना त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांची कायम साथ मिळाली आहे. दरम्यान, गुणरत्न सदावर्ते हे , पहिल्याच आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. आता येत्या एपिसोडमध्ये काय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.   

टॅग्स :गुणरत्न सदावर्तेबिग बॉस