Join us

Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 23:28 IST

वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या नावाचीही चर्चा रंगली होती. आता गुणरत्न सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात त्यांच्या हटके अंदाजात एन्ट्री घेतली आहे. 

Bigg Boss 18 : बिग बॉस हिंदीचा नवा सीझन आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक दिसणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या नावाचीही चर्चा रंगली होती. आता गुणरत्न सदावर्तेंनीबिग बॉसच्या घरात त्यांच्या हटके अंदाजात एन्ट्री घेतली आहे. 

"माझं आताच सलमानने कौतुक केलं. ना पेशी होगी ना गवाही होगी...तुम हमारी क्लाइंट बनोगी तो जो भी हुज्जत होगी वो खतम होगी...अयोध्या मध्ये मी काम केलंय...मुंबईत कानुनी राज केलंय. मी डाकूंच्या खानदानीतून आहे. हम डंके की चोट पर आते है...राज रजवाडे के उपर वर्ते होते है", असं सदावर्ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सलमानलाही हसू आवरलं नाही. 

बिग बॉसच्या घरात जाण्याआधीच गुणरत्न सदावर्तेंनी यांनी मीडियाला याबाबत माहिती दिली होती. गुणरत्न सदावर्ते हे कायमच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर ते प्रेक्षकांचं कसं मनोरंजन करणार, हे पाहावं लागेल. बिग बॉस हिंदीच्या घरात एक मराठमोळा चेहरा दिसणार असल्याने प्रेक्षकही उत्सुक आहेत.   

टॅग्स :बिग बॉसगुणरत्न सदावर्तेसलमान खान