Join us

अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 09:19 IST

बिझनेसमन अश्नीर ग्रोव्हरची सलमानने चांगलीच पोलखोल केली असून डॉली चायवालासोबत मजा-मस्ती केलेली दिसली

सध्या Bigg Boss 18 ची चांगलीच चर्चा आहे. सलमान खान पुन्हा एकदा त्याच्या खास स्वॅगमध्ये Bigg Boss 18 चं सूत्रसंचालन करतोय. Bigg Boss 18 च्या वीकेंड का वारचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या प्रोमोत Bigg Boss 18 च्या मंचावर डॉली चायवाला आणि अश्नीर ग्रोव्हरची एन्ट्री झालीय. या दोघांना सलमानने  वेगळेच प्रश्न विचारलेत. त्यामुळे दोघांचीही बोलती बंद झालीय. काय घडलंय नेमकं? जाणून घ्या

Bigg Boss 18 च्या मंचावर डॉली चायवाला आणि अश्नीर ग्रोव्हरची एन्ट्री

Bigg Boss 18 चा नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या प्रोमोत पाहायला मिळतं की, व्हायरल गायिका खुशी, डॉली चायवाला आणि उद्योजक अश्नीर ग्रोव्हर यांची Bigg Boss 18 च्या मंचावर एन्ट्री होते. त्यावेळी डॉली चायवाला त्याच्या नेहमीच्या स्टाइलमध्ये चहा बनवतो तेव्हा सलमान त्याची फिरकी घेतो. पुढे अश्नीर ग्रोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री होते. त्यावेळी सलमानने चांगलीच फिरकी घेऊन अश्नीर ग्रोव्हरची बोलती बंद केलेली दिसली.

सलमानने अश्नीर ग्रोव्हरची घेतली फिरकी

मंचावर अश्नीर ग्रोव्हरची एन्ट्री होती. पुढे सलमाननेा अश्नीरला विचारलं की, "तुम्ही माझ्याबद्दल जे बोललात की मला इतक्या पैशांमध्ये साइन केलं. ते सर्व आकडे तुम्ही चुकीचे सांगितले. हा कोणता दोगलापन आहे?" यावर उत्तर देताना अश्नीर म्हणतो की, "तुम्हाला जेव्हा आम्ही ब्रँड अँबेसेडर बनवलं तो आमचा सगळ्यात स्मार्ट निर्णय होता." पुढे सलमान म्हणतो की, "आता जो तुमचा बोलण्याचा टोन आहे तो तेव्हा नव्हता. त्यावेळी तुमचा अ‍ॅटिट्यूड काहीतरी वेगळाच होता." हे ऐकताच अश्नीरची बोलती बंद होते. हा विशेष भाग आज प्रेक्षकांना कलर्सनर बघायला मिळेल.

 

टॅग्स :बिग बॉससलमान खान