Join us

"आज तू इथे असता तर...", वडिलांच्या आठवणीत शिल्पा शिरोडकर भावुक; शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 11:46 IST

अलिकडेच मनोरंजनविश्वात 'बिग बॉस १८' च्या सीझनची चांगलीच चर्चा रंगली.

Shilpa Shirodkar : अलिकडेच मनोरंजनविश्वात 'बिग बॉस १८' च्या सीझनची चांगलीच चर्चा रंगली. करणवीर मेहरा या सीझनचा विजेता ठरला. दरम्यान, यंदाच्या सीझनमध्ये एक मराठमोळा चेहरा देखील सहभागी झाल्याचा पाहायला मिळायला. ९० च्या दशकातील 'सेन्शेशनल क्वीन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शिरोडकरही (Shilpa Shirodkar) या शोमध्ये सहभागी झाली होती. शिल्पा शिरोडकर 'बिग बॉस १८' चे विजेतेपद जिंकू शकली नाही आणि शोमधून बाहेर पडली. ती त्या घरात पहिल्या दिवसापासून होती, पण १०२ व्या दिवशी तिचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. 'गोपी किशन', 'किशन कन्हैय्या', 'त्रिनेत्र' यांसारख्या चित्रपटांमधून काम  बॉलिवूड इंडस्ट्री गाजवणारी शिल्पा शिरोडकर या शोमुळे पुन्हा प्रसिद्धीझोतात आली. अशातच  नुकतीच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या खास पोस्ट शएअर केली आहे. या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

शिल्पा शिरोडकरने इन्स्टाग्रावर पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये तिने आपला लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. शिवाय आपल्या वडिलामसोबतच्या आठवणींना उजाळा देत अभिनेत्री भावुक झाल्याचं पाहायला मिळतंय. या पोस्टला कॅप्शन देत अभिनेत्रीने म्हटलंय, "जवळपास १८ वर्षांपूर्वी तू आम्हाला सोडून गेलास. वेळ कसा निघून गेला, कळलंच नाही. आजही मला आठवतंय की मी कायम स्वतंत्र आणि सक्षम व्हावं असं तुला वाटायचं, ही मुल्ये तू माझ्यामध्ये रुजवली आहेस. "

पुढे अभिनेत्रीने म्हटलंय, "आज तू इथे असतास तर नक्कीच तुला माझा अभिमान वाटला असता. अशा क्षणांमुळे मला तुझी कायम आठवण येते, बाबा. मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि  कायमच करत राहणार." अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली आहे. 

शिल्पा शिरोडकरच्या करिअरविषयी सांगायचं तर तिने 'आँखे', 'गोपी किशन', 'खुदा गवाह', 'हम'  यासारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसंच तिने 'एक मुठ्ठी आसमान' या मालिकेतही भूमिका साकारली आहे. अमिताभ बच्चन, मिथून चक्रवर्ती ते शाहरुख खान अशा सर्वच अभिनेत्यांसोबत शिल्पा शिरोडकर अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत . शिल्पा ही नम्रता शिरोडकर हिची सखी बहीण आणि साऊथ सुपरस्टार महेश बाबू यांची मेव्हणी आहे.

टॅग्स :शिल्पा शिरोडकरबॉलिवूडबिग बॉससेलिब्रिटीसोशल मीडिया