Bigg Boss 18 Finale: 'बिग बॉस १८' च्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस'च्या विजेत्याचे नाव जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे. या सीझनमधील ६ स्पर्धकांनी ग्रँड फिनाले गाठले. पण, आता 'बिग बॉस १८' मधील एका स्पर्धकाचा प्रवास संपला आहे. 'बिग बॉस'ला टॉप ५ सदस्य मिळाले आहेत.
'बिग बॉस १८'च्या टॉप ६ मध्ये अभिनेता विवियन डिसेना, करणवीर मेहरा, ईशा सिंह, अविनाश मिश्रा, चुम दरंग आणि रजत दलाल यांनी जागा मिळवली होती. आता पहिलं एव्हिक्शन ग्रँड फिनालेमध्ये झालं आहे. अभिनेता वीर पहाडिया हा 'स्काय फोर्स' च्या प्रमोशनसाठी ग्रँड फिनालेमध्ये पोहचला होता. एका टास्कदरम्यान त्यानं टीव्ही अभिनेत्री आणि लोकप्रिय 'बिग बॉस' स्पर्धक ईशा सिंह ही टॉप ५ मध्ये नसल्याचं सांगितलं.
अभिनेत्री टॉप ५ मध्ये आपले स्थान मिळवण्यात अपयशी ठरली आहे. ईशा सिंहबाहेर पडल्यानं तिचे चाहते भावूक झाले आहेत. ईशा सिंह ही आता २६ वर्षांची आहे. पण ती १७ वर्षांची असल्यापासून टीव्हीवर काम करत आहे. आता बिग बॉसच्या घरात विवियन, करणवीर, अविनाश मिश्रा, चुम आणि रजत हे फक्त पाच सदस्य उरले आहेत. आता कोण ट्रॉफी उचलणार याकडे चाहत्यांचं सर्वांचं लक्ष लागलं आहे.