Join us

'हे' आहेत बिग बॉसचे टॉप 2 सदस्य; विजेता पदासाठी दोघांमध्ये आता काँटे की टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 00:34 IST

बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी आता दोघांमध्ये काँटे की टक्कर होणार आहे.

Bigg Boss 18 Finale: बहुप्रतिक्षीत ठरलेल्या बिग बॉस १८च्या (bigg boss 18) ग्रँड फिनाले सुरू आहे. यंदाच्या पर्वाची ट्रॉफी कोण पटकावणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. करणवीर मेहरा (Karan Veer Mehra), रजत दलाल (Rajat Dalal आणि विवियन डिसेना (Vivian Dsena) हे 'बिग बॉस'च्या टॉप 3 मध्ये पोहचले होते. आता यापैकी एक जण बाहेर पडला आहे. तर दोघांमध्ये ट्रॉफीसाठी काँटे की टक्कर होणार आहे. 

यंदाच्या सीझनमधील टॉप ३ मधून रजत दलाल (Rajat Dalal Evicted) बाहेर पडला आहे. कमी मत मिळाल्यानं त्याचा प्रवास संपला. रजत दलालचा बिग बॉसच्या घरातील प्रवास हा वेगवेगळ्या छटांचा राहिला आहे. 'बिग बॉस १८' च्या घरात तो आत्मविश्वासाने खेळला होता. त्याच्या स्पष्टवक्त्या शैलीनं सर्वांचं मन जिंकलं होतं. अनेकांनी तर तोच  'बिग बॉस'चा विजेताही होणार असंही म्हटलं होतं. पण, त्याचं स्वप्न भंगलं आहे. 

रजत दलाल हा फरिदाबाद येथील फिटनेस ट्रेनर आणि सोशल मीडिया इन्फ्लूअन्सर आहे. रजत दलालचे इंस्टाग्रामवर 2 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तो डिजिटल क्रिएटर म्हणूनही ओळखला जातो. तो अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही सापडला आहे. आता करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना यांच्यात आता लढत होणार आहे.  या दोघांपैकी एक जण बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार आहे. दरम्यान सोशल मीडियावर विवियन डिसेनाची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. आता काही क्षणात सलमान खान एकाचा हात धरुन त्याला 'बिग बॉस' चा विजेता घोषित करणार आहे. या क्षणाची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. 

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटीटेलिव्हिजनविवियन डसेना