Join us  

Bigg Boss 18 : "तुम्ही माझ्या हृदयात स्थान बनवलं आहे", 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचं चाललंय तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 2:22 PM

बिग बॉस १८मध्ये वादग्रस्त विधानांनी चर्चेत असलेले वकील गुणरत्न यांनी एन्ट्री घेतल्याने चाहतेही आश्चर्यचकित झाल्याचं पाहायला मिळालं. आता बिग बॉसच्या घरातील सदावर्तेंचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

Bigg Boss 18: बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व संपल्यानंतर बिग बॉस हिंदीच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. बिग बॉस १८मध्ये वादग्रस्त विधानांनी चर्चेत असलेले वकील गुणरत्न यांनी एन्ट्री घेतल्याने चाहतेही आश्चर्यचकित झाल्याचं पाहायला मिळालं. आता बिग बॉसच्या घरातील सदावर्तेंचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

गुणरत्न सदावर्तेंनी बिग बॉसमध्ये एन्ट्री घेताच त्यांच्या हटके स्टाइलने सलमान खानचीही बोलती बंद केली होती. त्यानंतर आता बिग बॉसच्या घरात त्यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे.  सदावर्तेंनी दुसऱ्याच दिवशी बिग बॉसचं घर डोक्यावर घेतलं आहे. जेलमध्ये असलेल्या हेमा बग्गाला ते विचारतात "बग्गाजी शस्रिया काल". त्यावर ती म्हणते "तुम्ही बग्गाजी का म्हणता? हेमा का म्हणत नाही?". "तुम्ही माझ्या हृदयात स्थान बनवलं आहे. या जन्मात माझं तुझ्याबरोबरच नातं तुटणार नाही. पहले इन्हे आजाद करो, फिर रोटी की बात करो, बग्गाजी को छोडो लोगो मे असंतोष है", असं सदावर्ते म्हणतात. त्यानंतर घरातील सगळेच सदस्य हसू लागतात. 

बिग बॉसच्या घरात सदावर्ते व्यायामही करताना दिसत आहेत. त्यानंतर सदावर्ते त्यांचा हटके गॉगल सदस्यांना दाखवत असल्याचं दिसत आहे. "किसीके माय के लाल की ताकद जो हमसे उलझ सके" असं ते म्हणताना दिसत आहेत. सदावर्तेंचा बिग बॉसच्या घरातील हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बिग बॉस १८च्या घरात गुणरत्न सदावर्तेंनी एन्ट्री घेतल्यानंतर चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नेहमी वादग्रस्त विधानांनी चर्चेत असलेले सदावर्ते बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांचं कसं मनोरंजन करणार हे पाहावं लागलं.  

टॅग्स :बिग बॉसगुणरत्न सदावर्तेसेलिब्रिटी