अभिनेता करणवीर मेहराने (Karanveer Mehra) यंदा 'बिग बॉस १८' ची ट्रॉफी जिंकली. या शोमध्ये करणवीर आणि चुम दरांग (Chum Darang)यांचं अफेअर खूप चर्चेत होतं. आता घराबाहेर आल्यानंतर करणवीर आणि चुम यांच्यातलं प्रेम आणखी खुललं आहे. करणवीरने तर थेट ट्विटरवर तिच्यासोबतचे फोटो शेअर करत रोमँटिक कॅप्शनही लिहिलं आहे. या फोटोंवर नेटकऱ्यांनी मात्र प्रश्नार्थक कमेंट्स केल्या आहेत.
करणवीर मेहराचा आधीच दोन वेळा घटस्फोट झाला आहे. शोमध्येही त्याला यावरुन ट्रोल केलं गेलं होतं. आता १३ वर्षांनी लहान चुम दरंगला तो डेट करत असल्याने त्याला खूप ट्रोल करण्यात येत आहे. करणवीरने चुमसोबत कोझी फोटो शेअर करत लिहिले, "मैने जो कुछ भी सोचा हुआ है वो मै वक्त पे कर जाऊंगा, तुम मुझे जहर लगती हो और मै किसी दिन तुम पे मर जाऊंगा."
एकीकडे चुम आणि करणवीर यांच्या आनंदाला पारावर राहिलेला नाही. त्यांच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लिहिले, 'हे खरंच प्रेमात आहेत','तुम्ही दोघं खूप छान दिसत आहात','करणला किती घाई आहे, बिग बॉस संपून १५ दिवसही नाही झाले आणि हा मजनू बनला आहे'.
१९ जानेवारी रोजी बिग बॉस फिनाले झाला. करणवीर मेहरा विजेता तर विवियन डिसेना रनर अप ठरला. करणवीरला बिग बॉसची चमकती ट्रॉफी आणि ५० लाख रुपये मिळाले.