Karanveer Mehra: अखेर पंधरा आठवड्यांच्या प्रवासानंतर बिग बॉस सीझन १८ ला (Bigg Boss 18) चा काल ग्रँड फिनाले पार पडला. करणवीर मेहरा (Karanveer Mehra) यंदाच्या पर्वाचा विजेता ठरुन त्याने ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. अभिनेता विवियन डिसेना रनर अप ठरला. दरम्यान, करणने या प्रवासात प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. अनेकांशी त्याची घरात त्याचे वाद झाले. शिवाय त्याची शिल्पा शिरोडकर व चुम दरांग यांच्यासोबतची मैत्री चर्चेत आली. अशातच 'बिग बॉस १८' चा विजेता ठरल्यानंतर करणवीर मेहराने आपला खास मित्र म्हणजेच दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत भावुक झाला.
नुकताच करणवीरने माध्यमांसोबत संवाद साधला. त्यादरम्यान त्याने सुशांत सिंग राजपूतसोबतच्या काही आठणींना उजाळा दिला. त्यावेळी करणवीर म्हणाला, "हे सगळं माझ्यासाठी खूपच खास आहे. मी खूप आनंदी आहे कारण त्याला मी हे खास सरप्राइज देणार आहे. पुढे सुशांतबद्दल बोलताना करणवीरने म्हटलं की, "उद्या माझ्या सगळ्यात जवळच्या मित्र सुशांत सिंह राजपूतचा वाढदिवस आहे. त्यामुळे मी सगळ्यात जास्त आनंदी आहे. कुठे ना कुठे तो माझ्या आयुष्यातील महत्वाचा भाग होता. २१ जानेवारीच्या दिवशी त्याची पुण्यतीथी आहे."
सुशांत सिंग ने केलेली मदत
'बिग बॉस १८' जिंकल्यानंतर करणवीर खुलासा करत म्हणाला, "माझ्या करिअरमध्ये काही खास घडतच नव्हतं. त्यावेळी सुशांतने मला मदत केली होती. तो एक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता, कदाचित त्यामुळेच तो आपलं म्हणणं कायम स्पष्टपणे मांडायचा. त्याने फ्यूचरमधील बऱ्याच गोष्टींचे प्लॅन करुन ठेवले होते. ज्या संदर्भात तो नेहमीच चर्चा करायचा की येत्या ५ वर्षांमध्ये या सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत. त्याने त्याच्या ओळखीतील काही लोकांबरोबर भेटही घालून दिली होती".