Join us  

Bigg Boss 18 सलमान खानच होस्ट करणार? लवकरच Promo शूट करणार असल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 5:14 PM

दुखापतीमुळे यावेळी सलमान बिग बॉस होस्ट करणार नाही अशा चर्चा होत्या.

दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि बिग बॉस हे एक समीकरणच आहे. सलमान बिग बॉसचा होस्ट नसेल तर चाहते नाराज होतात. नुकतंच बिग बॉस ओटीटीचं होस्टिंग अनिल कपूरने केलं. आता बिग बॉस 18 (Bigg Boss 18) ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान दुखापतीमुळे यावेळी सलमान बिग बॉस होस्ट करणार नाही अशा चर्चा होत्या. आता या चर्चा निव्वळ अफवा असून लवकरच सलमान बिग बॉस 18 चा प्रोमो शूट करणार असल्याचं समोर आलं आहे.

दोन दिवसांपूर्वी सलमान खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. मुंबईतील एका इव्हेंटमध्ये तो सहभागी झाला होता. यावेळी त्याला सोफ्यावरुन नीट उठताही येत नव्हतं. सलमानला कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळेच त्याला आधार घेऊन उठावं लागत आहे. तसंच त्याचं वजनही बरंच वाढलेलं दिसत आहे. अशा परिस्थितीत सलमान बिग बॉस 18 होस्ट करणार नाही हे जवळपास निश्चितच झालं. पण आता ही अफवा असल्याचं समोर आलं आहे. दुखापत असली तरी सलमान त्याच्या वर्क कमिटमेंट्स पूर्ण करत आहे. त्याने सिकंदर सिनेमाच्या काही भागाचं शूटही केलं. तसंच तो बिग बॉस 18 चा प्रोमोही शूट करणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. 

सलमान खानने बिग बॉस होस्ट केलं नाही तर शो फ्लॉप आहे अशाच प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर येत आहेत. सलमानशिवाय इतर कोणालाच बिग बॉसचा होस्ट म्हणून स्वीकारण्याची प्रेक्षकांची तयारी दिसत नाही. भाईजानने इतकं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. बिग बॉस 18 मध्ये कोण स्पर्धक सहभागी होणार आणि कधीपासून शो सुरु होणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र रिपोर्ट्नुसार, 5 ऑक्टोबरपासून शो सुरु होण्याची शक्यता आहे.

सलमान खान सध्या 'सिकंदर' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय तो आगामी 'द बूल' मध्येही दिसणार आहे. पुढील वर्षी ईदच्या मुहुर्तावर सलमानचा सिनेमा प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :सलमान खानबिग बॉसटेलिव्हिजन