Join us  

Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2024 10:02 PM

अमिताभ बच्चन ते शाहरुख खान सर्वांसोबतच केलं काम, आता बिग बॉस गाजवणार

बिग बॉस १८ (Bigg Boss 18) ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. सलमान खानच यंदाचाही शो होस्ट करत आहे. यावेळी 'टाईम का तांडव' ही शोची थीम असणार आहे. शोमध्ये कोण कोण येणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. यातच ९० च्या दशकातील एक अभिनेत्री येणार ही देखील चर्चा होती. ती अभिनेत्री आहे शिल्पा शिरोडकर. नुकतंच शिल्पा यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश घेतला आहे. 

अमिताभ बच्चन, मिथून चक्रवर्ती ते शाहरुख खान अशा सर्वच अभिनेत्यांसोबत सुपरहिट सिनेमे देणारी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर. शिल्पा ही नम्रता शिरोडकर हिची सखी बहीण आणि साऊथ सुपरस्टार महेश बाबू यांची मेव्हणी आहे. ९० च्या दशकातील अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. सलमानने शिल्पाचं स्वागत केलं. तिला पाहताच तो म्हणाला, 'इथे कुठे आली तू?' यावर शिल्पा म्हणते, "मी बिग बॉसची मोठी चाहती आहे. सलमान माझा सर्वात आवडता होस्ट. मी इथे नियम पाळणं नक्कीच शिकेन. मी आधीचे एपिसोड्स पाहिले तेव्हा मला वाटायचं की इथे राहणं नक्की कसं असेल. मला हा अनुभव घ्यायचा होता." 

शिल्पा दिसायला अतिशय सुंदर आणि स्वभावाने अतिशय शांत वाटते. आता बिग बॉसच्या घरातील षडयंत्रांना ती कशी सामोरी जाणार की ती देखील यात सामील होणार हे खेळ पाहताना कळणार आहे. यावेळी बिग बॉस १८ मध्ये चाहत पांडे, गुणरत्न सदावर्ते, शहजादा धामीसह अनेक टीव्ही कलाकार, इन्फ्लुएन्सर दिसणार आहेत. 

टॅग्स :शिल्पा शिरोडकरबिग बॉसकलर्ससलमान खान