Join us  

Bigg Boss 18 : दिशा वकानीची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री? दयाबेनला मिळाली तब्बल 'इतक्या' कोटींची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 11:24 AM

दयाबेन बनून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री दिशा वकानीला बिग बॉस १८ ची ऑफर आहे. दयाबेनला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

Bigg Boss 18 : छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे 'बिग बॉस'. सध्या 'बिग बॉस मराठी ५' ची सर्वत्र चर्चा आहे. अशातच 'बिग बॉस हिंदी'चा नवा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस १८' मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 'बिग बॉस'च्या नव्या सीझनमधील काही स्पर्धकांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तर काही नावांबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील दयाबेनलाही 'बिग बॉस हिंदी'ची ऑफर मिळाली आहे. 

दयाबेन बनून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री दिशा वकानीला 'बिग बॉस १८' ची ऑफर आहे. एवढंच काय दिशा वकानीला नुसती 'बिग बॉस १८' ची ऑफर नसून तिला सगळ्यात जास्त ऑफरही देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. टेलीअपडेटरने दिलेल्या वृत्तानुसार, 'बिग बॉस १८' मध्ये सहभागी होण्यासाठी दयाबेन म्हणजेच दिशा वकानीला तब्बल ६५ कोटींची ऑफर देण्यात आली आहे. 'बिग बॉस'च्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या कोटींची ऑफर देण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. 

त्यामुळे 'तारक मेहता का उलटा चष्मा'नंतर आता 'बिग बॉस १८' मध्ये दयाबेन दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दयाबेनला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. पण, दिशा वकानीने मात्र बिग बॉसची ऑफर नाकारली आहे. त्यामुळे ती 'बिग बॉस १८'मध्ये सहभागी होणार नाही. दरम्यान, 'बिग बॉस १८' चा ग्रँड प्रिमियर ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. येत्या रविवार पासून 'बिग बॉस'चा हा नवा सीझन सुरू होणार आहे. 

टॅग्स :बिग बॉसतारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानी