त्याचे झाले असे की, या आठवड्यात बिग बॉसने घरातील सदस्यांसाठी एक आगळा-वेगळा टास्क देताना निर्माण झालेल्या जोडप्यांना एकमेकांप्रती असलेले प्रेम पडताळून पाहण्यासाठीची एक संधी दिली. त्यानुसार ‘गौरव चोपडा-बानी जे’, ‘रोहन मेहरा-लोपामुद्रा राऊत’, ‘मनू पंजाबी-मोनालिसा’ आणि ‘मनवीर गुर्जर-नितीभा कौर’ या लव्हबर्ड्सना आपल्या जोडीदाराला ‘प्यार का तोफा’ द्यायचा असतो. आपल्या जोडीदाराला ‘प्रेमपत्र किंवा गिफ्ट’ देण्याची जबाबदारी घरातील पुरुषमंडळींवर असते. त्यामुळे घरात अतिशय रोमॅँटिक वातावरण निर्माण होते. मात्र या रोमॅँटिक वातावरणात अडथळा निर्माण करण्यासाठी प्रियंका जग्गा आणि स्वामी ओम यांना खलनायकाची भूमिका बजवायची असते. }}}} ">http://}}}} ">Housemates have a task to write love letters to their crush inside the house; but #PriyankaJagga & #OmSwami will be the villains! #BB10pic.twitter.com/7TYUm2R5a9— Bigg Boss (@BiggBoss) December 20, 2016
प्रेमपत्र किंवा गिफ्ट फाडून-तोडून टाकण्यासाठी हे दोघेही लव्हबडर््सच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. अशात रोहन मेहरा आपली प्रियसी अर्थात लोपामुद्रासाठी एक गिफ्ट घेऊन येतो. मात्र मध्येच त्याला स्वामी ओम रोखतात. दोघांमध्ये या गिफ्टवरून चांगलीच हातापायी होते. एकमेकांना धक्के देत गिफ्टसाठी दोघांचा आटापिटा सुरू असतो. अशात रोहन कसाबसा स्वामी ओमच्या तावडीतून सुटत बाथरूममध्ये लपून बसतो.#PriyankaJagga & #OmSwami are given a task to obtain the love letters. Watch Om swami getting violent tomorrow! #BB10— Bigg Boss (@BiggBoss) December 19, 2016
बिग बॉसचा संताप एवढा असतो की, त्यांच्या टिपिकल आवाजामध्येदेखील बदल झाल्याचे स्पष्टपणे प्रेक्षकांना बघावयास मिळते. बिग बॉसचा संताप बघून स्वामी ओमची बोलतीच बंद होते. नेहमीच बिग बॉसचा धावा करणाºया स्वामी ओमला आता बिग बॉसनेही फटकारल्याने स्वामी ओमला घरात आता कोणाचा आधार असेल? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.}}}} ">Love is in the air! Watch the highlights of Pyaar Wala Task from tonight's episode in this #BB10#video! https://t.co/NZED5Ql7dI— Bigg Boss (@BiggBoss) December 20, 2016