Join us

बिग बॉसच्या घरात खरंच मद्यपान करायला नाहीये का परवानगी? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 6:07 PM

बिग बॉसच्या घरात असताना स्पर्धकांना मद्यपान करायला मिळते का हा प्रश्न नेहमीच सगळ्यांनाच पडलेला असतो. या प्रश्नाचे उत्तर आम्ही आज तुम्हाला देणार आहोत.

ठळक मुद्देबिग बॉसच्या घरात असताना स्पर्धकांना मद्यपान करायला मिळते का हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो तर याचे उत्तर नाही असे असून केवळ त्यांना बिग बॉसच्या घरात असताना सिगारेटच ओढण्याची मुभा असते.

बिग बॉस या कार्यक्रमाचे आजवर अनेक सिझन प्रसिद्ध झाले असून या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन गाजले आहेत. या कार्यक्रमाविषयी अनेक प्रश्न नेहमीच प्रेक्षकांना पडतात. या कार्यक्रमाविषयी काही खास गोष्टी फिल्मी बीट या युट्युब वाहिनीने सांगितल्या आहेत.

बिग बॉसच्या घराविषयी नेहमीच लोकांना पडणाऱ्या अनेक प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली आहेत. बिग बॉसच्या घरात असताना स्पर्धकांना मद्यपान करायला मिळते का हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो तर याचे उत्तर नाही असे असून केवळ त्यांना बिग बॉसच्या घरात असताना सिगारेटच ओढण्याची मुभा असते. तसेच बिग बॉसच्या घरात चिकन, मासे यांसारखे कोणतेही मांसाहरी पदार्थ शिजवले जात नाही. बिग बॉसच्या घरात केवळ शाकाहारी जेवण बनवले जाते. हे जेवण घरातील सगळे सदस्य मिळून बनवतात. केवळ विकेंडच्या स्पेशल भागाच्या वेळी जेवण बाहेरून येते. 

बिग बॉसच्या घरात घड्याळ नसते. त्यामुळे सूर्य उगवण्याच्या आणि मावळण्याच्या वेळेवरून स्पर्धक किती वाजले असतील याचा अंदाज लावतात. तसेच सकाळी आठ वाजता त्यांना उठवले जाते आणि रात्री अकराला घराचे दिवे बंद होतात याची त्यांनी कल्पना असते. 

बिग बॉसच्या घरात खूपच आरसे असतात. याचे कारण म्हणजे या आरशांच्या पलीकडे बसून बिग बॉसची टीम या कार्यक्रमातील स्पर्धकांवर नजर ठेवत असते. तसेच घरात काहीही इर्मजन्सी आली तर त्यासाठी बिग बॉसची टीम सज्ज असते. घराच्या बाहेर सतत अ‍ॅम्ब्युलन्स उभी असते, तसेच डॉक्टर सतत कार्यक्रमाच्या सेटवर असतात. फायर ब्रिगेडची गाडी देखील घराच्या समोर असल्याचे पाहायला मिळते. 

बिग बॉसच्या घरात राहाण्यासाठी स्पर्धकांना किती पैसा मिळतो हा प्रश्न देखील नेहमीच सगळ्यांना पडतो. सामान्य लोकांपासून सेलिब्रेटीपर्यंत सगळ्यांनाच या घरात राहायला पैसे मिळतात. केवळ एखादा सेलिब्रेटी किती प्रसिद्ध आहे यावरून ही रक्कम ठरते. ही रक्कम ३० हजाराहून काही लाखांपर्यंत असते. 

कॅमेरासमोर नेहमीच बिग बॉसचे घर आपल्याला चकाचक असल्याचे पाहायला मिळते. हे घर बिग बॉसमधील स्पर्धक नव्हे तर बिग बॉसची टीम स्वच्छ ठेवते. टीम घर स्वच्छ करत असताना घरातील स्पर्धकांना ही टीम दिसू नये यासाठी पडदे टाकले जातात. 

टॅग्स :बिग बॉसबिग बॉस मराठीबिग बॉस 12