Join us

सापाचे विष पुरवठा आणि रेव्ह पार्टी प्रकरण: 'बिग बॉस' फेम एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 13:47 IST

नोएडा पोलिसांनी एल्विशविरोधात FIR दाखल केली आहे. एल्विशवर अवैधरित्या रेव्ह पार्टी आयोजित करणे आणि क्लबमध्ये सापांचे विष पुरवण्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता एल्विशची प्रतिक्रिया समोर आली आहे.

'बिग बॉस ओटीटी' फेम एल्विश यादव अडचणीत आला आहे. नोएडा पोलिसांनी एल्विशविरोधात FIR दाखल केली आहे. एल्विशवर अवैधरित्या रेव्ह पार्टी आयोजित करणे आणि क्लबमध्ये सापांचे विष पुरवण्याचा आरोप आहे. त्यामुळे एल्विशवर अटकेची टांगती तलवार असल्याचं म्हटलं जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता एल्विशची प्रतिक्रिया समोर आली आहे. एल्विशने त्याच्या ट्वीटरवरुन एक व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. 

"माझ्याविरोधात सध्या अनेक गोष्टी पसरवल्या जात आहेत. एल्विश यादवला अटक केल्याच्या बातम्याही माझ्यापर्यंत आल्या आहेत. नशेच्या पदार्थांबरोबर एल्विशला पकडलं गेल्याचंही बोललं जात आहे. माझ्याबद्दल पसरणाऱ्या या गोष्टींमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नसून त्या खोट्या आहेत. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. यामध्ये एक टक्काही सत्य नाही. मी उत्तर प्रदेश पोलिसांना सहकार्य करेन. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पोलिसांना मला सांगायचं आहे की यामध्ये मी सहभागी असेन, तर मला शिक्षेसाठी तयार आहे. पण, मीडियाने माझं नाव खराब करू नये." असं एल्विश म्हणाला. 

नेमकं प्रकरण काय? 

एका एनजीओजीच्या स्टिंग ऑपरेशननंतर नोएडा पोलिसांनी सेक्टर ४९ भागात छापेमारी केली होती. या छापेमारीत पाच कोब्रा आणि अन्य जातीचे मिळून एकूण नऊ साप आढळून आले. त्याचबरोबरच सापांचे विष पोलिसांना इथे सापडले. याप्रकरणी नोएडा पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून अन्य काही विरोधांत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यामध्ये युट्यूबर एल्विश यादवचाही समावेश आहे. 

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार