Join us  

रितेश देशमुखने पूर्ण केलं किरण मानेंच्या आईचं स्वप्न; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 7:13 PM

Riteish deshmukh: रितेशने चक्क किरण माने यांच्या आईची इच्छा पूर्ण केली. याविषयी किरणने इन्स्टावर पोस्ट शेअर करत त्याचे आभार मानले आहेत.

बिग बॉस मराठी (bigg boss marathi) या रिअॅलिटी शोमुळे रातोरात प्रकाशझोतात आलेला अभिनेता म्हणजे किरण माने (kiran mane). आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत येणारा किरण कलाविश्वात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर उघडपणे भाष्य करत असतो. यात बिग बॉस मराठी या कार्यक्रमावर तर त्याचं अफाट प्रेम आहे. त्यामुळे या कार्यक्रमाविषयी तो कायम सोशल मीडियावर पोस्ट शेअर करतो. यावेळी त्याने अभिनेता, दिग्दर्शक रितेश देशमुख (Riteish deshmukh) याच्याविषय़ी पोस्ट शेअर केली आहे.

आपल्या दिलखुलास व्यक्तीमत्त्वामुळे कायम चर्चेत येत असलेला रितेश आज मराठी माणसांच्या मनावर राज्य करतो. त्यामुळे चाहत्यांसाठी तो कायम काही ना काही करत असतो. यावेळी त्याने चक्क किरण माने यांच्या आईची इच्छा पूर्ण केली. याविषयी किरणने इन्स्टावर पोस्ट शेअर करत त्याचे आभार मानले आहेत.

काय आहे किरण मानेंची पोस्ट?

''कधी-कधी आपल्या काळजाच्या जवळच्यांचं एखादं छोट्टंसं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो तवा जे समाधान मिळतं ते शब्दांत नाय सांगू शकत ! माझी आई रितेश देशमुखची लै मोठ्ठी फॅन ! मी एकदा तरी रितेशला भेटावं अशी तिची लै लै म्हंजी लैच इच्छा होती. 'बिगबॉस'नं ती इच्छा पूर्ण केली. रितेशला मी जेव्हा हे सांगीतलं तेव्हा रितेशनं मला मिठी मारून कॅमेर्‍याच्या लेन्समध्ये बघितलं आणि म्हणाला, "आईS नमस्कार."...घरातले सांगतात, त्यादिवशी आई खूप खुश होती ! लब्यू बिगबॉस... लब्यू रितेश.

दरम्यान, छोट्या पडदा गाजवणारा किरण माने याने रुपेरी पडद्यावरही अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसंच अलिकडेच ते रावरंभा या सिनेमात झळकले होते. इतकंच नाही तर लवकरच ते महेश मांजरेकरांच्या आगामी सिनेमात काम करणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

टॅग्स :रितेश देशमुखकिरण मानेबिग बॉस मराठीसेलिब्रिटीटेलिव्हिजन