Join us

'मला गाव सुटंना..'; गावच्या मातीत रमला शिव, गावरान अंदाजामुळे जिंकली चाहत्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 15:34 IST

Shiv thakare: साधेपणाने पुन्हा एकदा शिवने जिंकली नेटकऱ्यांची मनं

आपला मराठी माणूस असं म्हणत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे शिव ठाकरे (shiv thakare). बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकणाऱ्या शिवने कमी कालावधीमध्ये तुफान यश आणि लोकप्रियता मिळवली आहे. मराठीसह हिंदी रिअॅलिटी शोमध्येही शिवने त्याचा ठसा उमटवला आहे. मात्र, लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या शिवने आजही त्याचा साधेपणा जपला आहे.

सध्या सोशल मीडियावर शिवचा एक व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिव गावच्या मातीत छान रमल्याचं दिसून येत आहे. शिवने गावातील एक सुरेख व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

शिवने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो गावातील शेळी पालन करणाऱ्या सोबत, कधी आमराईत तर कधी बैलगाडीवरुन जातांना दिसत आहे. विशेष म्हणजे यशाच्या शिखरावर असूनही शिवने त्याच्या साधेपणामुळे पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. या व्हिडीओमध्ये गावातील लोकांसोबतचं त्याचं वागणं पाहून चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. दरम्यान, शिवने मराठी कलाविश्वासह हिंदी इंडस्ट्रीतही पदार्पण केलं आहे. खतरों के खिलाडी, बिग बॉस हिंदी यांसारख्या रिअॅलिटी शो मध्ये तो झळकला आहे.

टॅग्स :शीव ठाकरेसेलिब्रिटीटिव्ही कलाकारमराठी अभिनेताबिग बॉस मराठी