सलमान खानच्या ‘बिग बॉस’ या शोमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री निक्की तंबोली (Nikki Tamboli ) सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे आणि यामुळे सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होतेय. 200 कोटी रूपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेला महाठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar Case) याच्यासोबत निक्कीचं नाव जोडलं जात आहे. याचमुळे निक्कीला सध्या ट्रोल केलं जात आहे.
निक्कीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ व्हायरल होताच, निक्कीची सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आली. मुंबईच्या रस्त्यावर निक्की ब्ल्यू कलकरच्या ड्रेसमध्ये दिसली. ती गाडीमधून उतरली, तर पापाराझींनी तिला घेरलं. याचदरम्यान निक्की रस्त्याच्या कडेला उभी झाली आणि पापाराझींना तिने बिनधास्त पोझ दिल्या. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने तिचा व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ पाहून युजर्सनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली.चंद्रशेचर वाट पाहतोय तिहारमध्ये तुझी, अशी कमेंट करत एका युजरने निक्कीला ट्रोल केलं. दीदी, पोलिस पकडून नेतील. बाहेर फिरू नकोस, अशी कमेंट एका युजरने केली.
बॅगवरूनही झाली ट्रोलयावेळी निक्की बॅग फ्लॉन्ट करताना दिसली. या बॅगवरूनही ती ट्रोल झाली. ही नक्कीच सुकेशने दिलेली बॅग असेल, असं एकाने लिहिलं. पावसात का भिजतेय, एक छत्री पण मागवून घे सुकेशकडून, अशा शब्दांत एका युजरने तिला ट्रोल केलं.
सुकेश प्रकरणात निक्कीचं नाव!सुकेश चंद्रशेखरच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आता निक्कीचं नावही समोर आलं आहे. ईडीने दाखल केलेल्या चार्टशीटनुसार,निक्कीला सुकेशकडून साडेतीन लाख रोख व गुच्ची बॅग भेट मिळाली होती. निक्कीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे की, पिंकीनं सुकेशची ओळख दाक्षिणात्य निर्माता शेखर म्हणून करुन दिली होती. रिपोर्टनुसार, निक्की तिहार तुरुंगात सुकेशला दोनदा भेटली आहे. ईडीनं दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये असं म्हटलं आहे की, एप्रिल 2018 मध्ये सुकेशनं पिंकीला 10 लाख रुपये दिले होते. त्यापैकी 1.5 लाख रुपये निक्की तांबोळीला दिले होते. दुसऱ्यांदा, म्हणजेच त्यांच्या पहिल्या भेटीच्या काही आठवड्यांनंतर, निक्की एकटीच सुकेशला भेटायला गेली तेव्हा तिला 2 लाख रुपये आणि एक गुच्ची बॅग देण्यात आली होती. या बॅगची किंमत 3.5 लाख रुपये होती. मूळचा कर्नाटकातील बंगळुरूचा रहिवासी असलेला सुकेश सध्या दिल्लीच्या तुरुंगात आहे आणि त्याच्यावर 10 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
ईडीने या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसविरोधातही (Jacqueline Fernandez) आरोपपत्र दाखल केले आहे. सुकेश चंद्रशेखरने तिला सुमारे 7 कोटी रुपयांचे दागिने गिफ्ट केल्याचा आरोप जॅकलिनवर आहे. याशिवाय आणखीही अनेक किमती वस्तू तिने त्याच्याकडून घेतल्याचा आरोप आहे.