बिग बॉसमधील सर्वात वादग्रस्त स्पर्धकांपैकी एक असलेला राहुल महाजन पर्सनल लाइफमुळे चर्चेत आला आहे. राहुलने तीन लग्ने केली. त्यातील त्याच्या दोन पत्नी श्वेता सिंह आणि डिंपी गांगुलीने त्याच्यावर कौंटुबिक हिंसाचाराचा आरोप लावला होता. इतकेच नाही तर राहुल ड्रग्स स्कॅंडलमध्येही अडकला होता. त्याने तिसरं लग्न नतालिया इलिना नावाच्या रशियन मुलीसोबत केलं. नतालिया ही कजाकिस्तानची राहणारी आहे.
मीडिया रिपोर्टनुसार राहुल महाजनचं तिसरं लग्न ही मोडण्याच्या मार्गावर आहे. गेल्यावर्षी दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. चार वर्षांच्या संसारनंतर दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. रिपोर्टनुसार, सुरुवातीपासूनच दोघांमध्ये मतभेद होते. तरीही दोघांनी संसार टिकवण्याचा प्रयत्न केला. गेल्यावर्षीपासून दोघे वेगळे झालेत. दोघांचा घटस्फोट झाला की नाही हे अद्याप कळलेले नाहीय.
राहुल महाजनच्या एका जवळच्या मित्राने सांगितले की, तिसर्या घटस्फोटानंतर त्याची तब्येत ठीक नाही. तो पुढे म्हणतो, 'ब्रेकअपनंतर तो पूर्णपणे तुटला होता. तो आता बरा आहे. तो पुन्हा सर्व चांगले करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी त्याची प्रकृती फारशी ठिक नव्हती. त्याच्या भूतकाळातील अनुभवांमुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल न बोलण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राहुलने पहिलं लग्न त्याची बालपणीची मैत्रीण श्वेता सिंहसोबत केलं होतं. दोघांचं लग्न २००६ मध्ये झालं होतं. दुसरं लग्न राहुलने डिंम्पी गांगुलीसोबत २०१० मध्ये केलं होतं. पण तीन वर्षात म्हणजे २०१३ मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर डिंपीने २०१५ मध्ये रोहित रॉयसोबत दुसरं लग्न केलं.