Join us  

‘बिग बॉस’मध्ये ‘इम्युनिटी मडालियन’ने करता येणार एलिम्नेशनचा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2016 8:42 PM

‘बिग बॉस 10’मध्ये रंगत येऊ लागली असून, यातून  स्पर्धकांचे घराबाहेर जाणे सुरू झाले आहे. अशातच ‘बिग बॉस’च्या घरात राहता ...

‘बिग बॉस 10’मध्ये रंगत येऊ लागली असून, यातून  स्पर्धकांचे घराबाहेर जाणे सुरू झाले आहे. अशातच ‘बिग बॉस’च्या घरात राहता यावे व नॉमिनेशनपासून आपला बचाव करता यावा यासाठी ‘बिग बॉस’ने ‘इम्युनिटी मडालियन’ ही संकल्पना आखली आहे. ‘इम्युनिटी मडालियन’ मिळविण्यासाठी ‘बिग बॉस’मध्ये बोली लागणार आहे. बोलीची रक्क्म 25,00,006 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. ‘बिग बॉस’चा दहावा सिझन चांगलाच रंगतो आहे. बिग बॉसच्या घरात यावेळी 15 स्पर्धकांना एंट्री देण्यात आली आहे. यात 7 सेलिब्रेटी तर 8 सामान्य नागरिकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. यातही दोन गट पाडण्यात आले आहे. एका गटात ‘सेलिब्रेटी’ तर दुसºया गटामध्ये असलेले सामान्य भारतीय ‘इंडियावाले‘. यापैकी दोन्ही गटातून एक-एक प्रतिस्पर्धी ‘बिग बॉस’च्या खेळातून बाहेर झाले आहेत. मात्र या खेळात कायम राहता यावे यासाठी ‘बिग बॉस’ने एक योजना आखली आहे. या योजनेनुसार स्पर्धकांना स्वत:चा बचाव करता येणार आहे. सोमवारी प्रसारीत होणाºया‘बिग बॉस’च्या एपिसोडमध्ये  ‘इम्युनिटी मडालियन’ मिळविण्यासाठी ‘बिग बॉस’मध्ये स्पर्धक बोली लावणार आहेत. ‘बिग बॉस’च्या घरातील बोली लावणाºया स्पर्धकांपैकी सर्वाधिक बोली लावणारे दोन स्पर्धक हे पदक मिळवू शकणार असून, त्यांना आपले घराबाहेर पडण्याचे नामांकन दोन वेळा वाचविता येणार आहे. यामुळे हा खेळ त्यांना अधिकाधिक वेळ खेळता येणार आहे. खेळात अधिक रंगत यावी यासाठी ही योजना‘बिग बॉस’ने आखली आहे. यामुळे बिग बॉसच्या घरात सुरू असलेल्या खेळात चांगलीच रंगत वाढणार आहे. ‘इम्युनिटी मडालियन’ मिळविण्यासाठी लावण्यात येणारी बोली ही स्पर्धकांना दिल्या जाणाºया रकमेतून द्यावी लागणार आहे. यामुळे खेळात कायम राहण्यासाठी कोणते स्पर्धक ही बोली लावणार याबद्दल चांगलीच उत्सुकता लागली आहे. यापूर्वी घराबाहेर पडणाºया नामांकनात राहुल देव, रोशन मेहरा, नतीभा कौल, नवीन शर्मा यांचा समावेश झाला आहे.