Bigg Boss : बिग बॉस हिंदीचा नवा सीझन नुकताच सुरू झाला आहे. एकीकडे बिग बॉस १८ सुरू आहे तर दुसरीकडे बिग बॉस कन्नड ११ देखील प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे. अशातच बिग बॉस कन्नड ११ च्या मेकर्सला महिला आयोग आणि पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे. बिग बॉसवर गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. महिलांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप शोवर करण्यात आला आहे. कर्नाटक राज्य महिला आयोग आणि कर्नाटक पोलिसांकडून बिग बॉस कन्नड विरोधात नोटीस जारी करण्यात आली आहे.
बिग बॉस कन्नड ११ मध्ये स्वर्ग आणि नरक हा टास्क खेळवण्यात आला होता. या टास्कमध्ये दोन ग्रुप बनवण्यात आले होते. काही सदस्यांना जेलमध्ये राहण्यास सांगितलं गेलं. पण, यादरम्यान महिलांच्या खासगी गोष्टींबाबत उल्लंघन झाल्या महिला आयोगाचं म्हणणं आहे. त्याबरोबरच महिलांना पुरुषांबरोबर बाथरुम शेअर करावं लागत आहे. स्वच्छता आणि जेवणाच्या बाबतही निष्काळजीपणा केला जात आहे, असं पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे बिग बॉस कन्नड ११ शोच्या मेकर्सला नोटीस पाठविण्यात आली आहे.
पण, घरातील सदस्यांनी मात्र यास स्पष्टपणे नकार दिल्याचं समजत आहे. घरातील सदस्यांना याबाबत विचारले असता त्यांनी कोणत्याही मानवी हक्कांचं उल्लंघन केलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. इच्छेविरुद्ध किंवा सहमतीशिवाय कोणत्याही गोष्टीची जबरदस्ती करण्यात येत नसल्याचंही स्पर्धकांचं म्हणणं आहे.