१९ आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर काल बिग बॉसच्या १६ व्या सीझनचा (Bigg Boss 16) विनर ठरला. 'बस्ती के हस्ती' एमसी स्टॅन (MC Stan) या शोचा विजेता ठरला. शिव ठाकरे आणि प्रियंका चहर चौधरी यांना हरवत एमसीने बिग बॉसची ट्राफी आपल्या नावावर केली. खरं तर अनेकांसाठी हा निकाल अनपेक्षित होता. कारण, प्रियंकाचं जिंकेल, अशी हवा होती. शिव ठाकरे यालाही लोकांनी विजेता ठरवलं होतं. पण अखेरच्या क्षणी एमसी स्टॅनने बाजी मारली. साहजिकच प्रियंका व शिवच्या चाहत्यांची निराशा झाली. सध्या नेटकरी बिग बॉसवर संतापल्याचं चित्र आहे. अनेकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
ट्रोल होतोय बिग बॉसकालच्या फिनाले नाईटनंतर बिग हा शो जबरदस्त ट्रोल होतोय. एमसी स्टॅन व बिग बॉस मेकर्सवर लोकांनी सगळी भडास काढली आहे. बिग बॉस हा शो बायस्ड आहे, फिक्स्ड आहे, असा आरोप अनेकजण करत आहेत. एमसी स्टॅनने शोमध्ये काहीही केलं नाही, मग तो जिंकलाच कसा, असा सवाल अनेक युजर्सनी उपस्थित केला आहे.
अनडिजर्विंग विनर ऑफ द हिस्ट्री, असं एका युजरने लिहिलं आहे. शेम ऑन कलर्स टीव्ही, अशा शब्दांत एका युजरने आपला संताप व्यक्त केला आहे. एमसी स्टॅन जिंकणं हा मोठ्ठा विनोद आहे. ज्या माणसाने शोमध्ये शून्य योगदान दिलं, त्यानेच ट्रॉफी जिंकली, हा प्रेक्षकांवरचा अन्याय आहे. शिव ठाकरे हाच विनर होता, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. प्रियंकाच या सीझनची विनर होती. आता मी हा शो कधीच बघणार नाही, असं एका युजरने म्हटलं आहे. अनेकांनी एमसी स्टॅनऐवजी शिव ठाकरे जिंकला असता तर इतकं दु:ख वाटलं नसतं, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सलमानही नाखुश?एमसी स्टॅनच्या विजयावर सलमानही नाखुश असल्याचा दावाही काही नेटकरी करत आहेत. सलमानने ज्या पद्धतीने प्रियंकाचं कौतुक केलं, ते बघता त्यालाही प्रियंकाच जिंकावी असं वाटत होतं, असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.