बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमधील चर्चित स्पर्धक अभिजीत बिचुकले यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा बिग बॉसमध्ये परत येण्याचा मार्ग बंद झाला आहे.
एबीपी माझाच्या रिपोर्टनुसार, अभिजीत बिचुकले मुंबईत बिग बॉस कार्यक्रम संपल्यावर फरार होऊ शकतो, असे कारण देत सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने अभिजीत बिचुकले यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. अभिजीत बिचुकले यांना चेक बाऊन्सप्रकरणी सातारा पोलिसांनी आरे पोलिसांच्या मदतीने २१ जूनला अटक केली होती.
एकमेव राजकीय नेता म्हणून अभिजीत बिचुकलेने ‘बिग बॉस मराठी 2’च्या घरात एन्ट्री घेतली आणि पहिल्याच दिवशी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्या आठवड्यात घरातील सर्व स्पर्धकांनी बिचुकलेला टार्गेट केले. पण बिचकुले घरातील सगळ्यांना पुरून उरला. बिग बॉसच्या घरातील त्याचा वावर आणि त्याची भांडणे सगळेच चर्चेचा विषय ठरले.