“अगर मैने एकबार कमिटमेंट करली तो मै खुदा किभी नाही सुनता" या शब्दांत अभिजीत बिचूकलेंनी घरामध्ये एंट्री घेतली...बिग बॉस मराठीच्या घरामधून काल माधव देवचके बाहेर पडला. त्याला दिलेल्या विशेष अधिकारानेत्याने नेहाला पुढील आठवड्यासाठी सेफ केले. तसेच ज्या क्षणाची प्रेक्षक वाट बघत होते तो क्षण आला असून आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अभिजीत बिचुकलेंची एंट्री होणार आहे.
अभिजीत बिचुकलेंच्या एंट्रीने घरातील समीकरणं नक्कीच बदलणार. घरामध्ये आता नवीन ग्रुप तयार झाले असून, नवी नाती तयार झाली आहेत. या सगळ्यामध्ये बिचुकलेंची योजना काय असेल तो कोणत्या ग्रुपमध्ये जाणार अशा विविध घडामोडी पण त्याच्या घरात पाहायला मिळणार हे मात्र नक्की.
या कारणामुळे बिचुकलेची घरातून झाली होती एक्झिट
बिग बॉसच्या घरातून बिचुकलेला २०१५मधील एका चेक बाऊन्स प्रकरणात अटक करण्यात आली . त्याला बिग बॉसच्या घरातून २१ जूनला सातारा पोलिसांनी अटक केली. या केसमध्ये २२ जूनला जामीनही मिळाला होता. पण, त्याच्या विरोधातील खंडणी प्रकरण समोर आले. त्यांनंतर बिचुकलेला साताऱ्याच्या प्रथम न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने त्याला दिलासा न दिल्याने त्याला तुरुंगात जावं लागले होते. अटक केल्यानंतर बिचुकलेने एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली होती की, मला बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर काढण्याचा हा कट होता. मी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याने हा राजकीय कट आखण्यात आला असल्याचे त्याने सांगितले होते.
माधव देवचकेच्या एक्झिटमुळे घारतील 'या' तीन स्पर्धकांना अश्रू अनावर
घरात एक टास्क रंगला ज्यामध्ये घरात कोण कसे चुकत आहे, त्या सद्स्याबाबत काय वाटते याबद्दल सदस्यांना कानउघडणी करायची होती. ज्यामध्ये आरोहने शिवची, हीनाने शिवानीची, नेहाने माधवची, किशोरी यांनी रुपालीची तर शिवानीने वीणाची कानउघडणी केली. प्रत्येक आठवड्यामध्ये एका सदस्याला घराबाहेर जाणे अनिवार्य आहे. या आठवड्यामध्ये माधव, हीना, वीणा, नेहा, किशोरी हे सदस्य नॉमिनेट होते. माधव आणि किशोरी डेंजर झोनमध्ये आले आणि माधवला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडावे लागले. शिवानी,हीना आणि नेहाच्या खूप जवळचा मित्र घरामधून बाहेर पडला आणि त्यामुळे या तिघींना अश्रू अनावर झाले. माधवच्या बाहेर जाण्याने नेहा आणि शिवानीला खूप मोठा धक्का बसला.