Join us

अशी आहे बिग बॉस मराठी २ स्पर्धक आरोह वेलणकरची प्रेमकथा, पाहा त्याच्या पत्नीचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 7:12 PM

आरोहच्या पत्नीचे नाव अंकिता असून त्यांची प्रेमकथा खूपच इंटरेस्टिंग आहे.

ठळक मुद्देआमचे अफेअर सुरू झाले. पण काहीच महिन्‍यांनंतर आमचं ब्रेकअप झालं. पण ब्रेकअप झाल्‍यानंतर मी तिला खूप मिस करायला लागलो. त्यामुळे मी तिला पुन्हा एकदा प्रपोज केले. तिने देखील पुन्हा नव्याने नात्याला सुरुवात करायला होकार दिला.

बिग बॉस मराठी २ च्या घरात नुकतीच अभिनेता आरोह वेलणकरची एंट्री झाली आहे. त्याने रेगे या चित्रपटातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. त्यानंतर घंटा या चित्रपटातही तो झळकला होता. बिग बॉस मराठीच्या घरात त्याला पाहून त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद होत आहे. 

बिग बॉसच्‍या घरात प्रवेश करणारा व्‍यक्‍ती इतर स्पर्धकांमध्ये लगेचच रुळतो असे म्हटले जाते. आरोहच्या बाबतीत तर हे अगदीच खरे आहे. तो या घरात जाऊन काहीच दिवस झाले असले तरी त्याची सगळ्यांसोबतच खूप चांगली मैत्री झाली आहे. वूटच्‍या अनसीन अनदेखाच्‍या नवीन क्लिपमध्‍ये आरोह इतर स्‍पर्धकांना त्‍याची प्रेम कहाणी आणि त्याची पत्नी अंकिताबद्दल सांगताना दिसत आहे. 

 त्याच्या बिग बॉसमधील मित्रमैत्रिणींना प्रेमकथेविषयी आरोह सांगतो की, ''मी ज्‍या नाटकाच्‍या ग्रुपमध्‍ये होतो त्‍यातच ती कोरिओग्राफर होती. आम्‍हा दोघांमध्‍ये अ‍ॅटिट्यूड होता... पण तरीही काही दिवसांनी आमच्यात मैत्री झाली. मी इंजिनिअरिंग करत असताना आवड म्हणून नाटकांमध्ये काम करत होतो. त्यामुळे मला असाइनमेंट्स स‍बमिट करायला वेळ मिळायचा नाही. अंकिता आणि माझ्या अजून काही मैत्रिणी माझ्या असाइनमेंट्स करून द्यायच्‍या. 

 आरोह आपल्या प्रेमकथेविषयी पुढे सांगतो, ''आधी फक्‍त तिला इरिटेट करण्‍यासाठी मी तिला पाहात बसायचो. पण नंतर माझ्या लक्षात आले की, मी तिच्या प्रेमात पडलो आहे. मग काय थेट मी तिला प्रपोज केले आणि आमचे अफेअर सुरू झाले. पण काहीच महिन्‍यांनंतर आमचं ब्रेकअप झालं. पण ब्रेकअप झाल्‍यानंतर मी तिला खूप मिस करायला लागलो. खरं सांगू तर आधी मी आमच्या नात्याविषयी सिरियस नव्‍हतो. पण ब्रेकअपनंतर ती दुसऱ्या मुलासोबत बोलत जरी असली तरी मला त्रास व्हायला लागला होता. अशीच सहा महिने गेली. तिच्याशिवाय मी राहूच शकत नाही याची जाणीव झाल्याने मी तिला पुन्हा एकदा प्रपोज केले. तिने देखील पुन्हा नव्याने नात्याला सुरुवात करायला होकार दिला आणि काहीच वर्षांच्या अफेअरनंतर आम्ही लग्न केले.'' 

टॅग्स :बिग बॉस मराठीआरोह वेलणकर