Join us

बिग बॉस स्पर्धक सुरेखा पुणेकर यांनी त्यांच्या भावा-बहिणींसाठी केल्या आहेत या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2019 5:14 PM

प्रख्‍यात लावणी नर्तिका बनण्‍यासाठी त्यांनी जीवनात अनेक संघर्ष आणि चढ-उतारांचा सामना केला आहे.

ठळक मुद्देआम्ही पाच बहिणी आहोत... चौघींना घर, जमीन घेऊन दिली... त्‍यांच्‍या मुलांची लग्‍न केली. भावाला दुकान, घर, जमीन घेऊन दिली... त्याचं लग्‍न केलं... सगळं केलं माझ्या या लावणीच्‍या मदतीने.

सुरेखा पुणेकर सध्या बिग बॉस मराठी 2 या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या कार्यक्रमात त्या स्पर्धक असून या कार्यक्रमामुळे त्या खऱ्या आयुष्यात कशा आहेत हे प्रेक्षकांना जाणून घेता येत आहेत. आज त्यांना ओळख ही त्यांच्या लावणीमुळे मिळाली आहे. सुरेखा पुणेकर यांनी आज लावणीसमाज्ञी म्हणून आपली एक ओळख निर्माण केली असली तरी त्यांच्यासाठी इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. 

महाराष्‍ट्राची लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी वर्षानुवर्षे नृत्य या क्षेत्रामध्‍ये आपले नावलौकिक मिळवले आहे. प्रख्‍यात लावणी नर्तिका बनण्‍यासाठी त्यांनी जीवनात अनेक संघर्ष आणि चढ-उतारांचा सामना केला आहे. त्यांच्या या संघर्षाविषयी त्यांनी नुकत्याच बिग बॉस मराठीमधील त्यांच्या मित्रमैत्रिणींना सांगितले. 

वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या क्लिपमध्‍ये सुरेखा पुणेकर आपल्‍या संघर्षांबाबत बोलताना आणि लावणीमुळे त्‍यांच्‍या कुटुंबाच्‍या उदरनिर्वाहासाठी कशाप्रकारे मदत झाली याबाबतच्‍या काही रोचक गोष्‍टी सांगताना दिसत आहेत.  सुरेखा पुणेकर त्‍यांच्‍या संघर्षाच्या दिवसांची आठवण काढत सांगतात, ''२००३ पर्यंत पूर्ण महाराष्‍ट्रात माझ्या लावणीच्या शोचे बोर्ड लागायचे. मला खूप साथ दिली या लावणीने... दोन महिन्‍यांचे तरी दौरे लागायचे... मी एक दौरा झाला की एक जमीन विकत घ्‍यायचे. १९८९ पासून माझा हा प्रवास सुरू झाला, रोजचे ३-४ शोज तरी असायचे.''

 दिगंबर नाईक आणि विद्याधर जोशी (बाप्‍पा) त्‍यांची ही जीवनगाथा ऐकून भारावून गेले. सुरेखा पुणेकर पुढे म्‍हणाल्‍या, ''२००३ नंतर मी थांबले आणि जवळजवळ तीन वर्षांचा ब्रेक घेतला. २००६ मध्ये लावणीचा सफर परत सुरू केला.'' काहीशा विचारमग्‍न झालेल्‍या सुरेखा पुणेकर पुढे म्‍हणाल्या, ''आम्ही पाच बहिणी आहोत... चौघींना घर, जमीन घेऊन दिली... त्‍यांच्‍या मुलांची लग्‍न केली. भावाला दुकान, घर, जमीन घेऊन दिली... त्याचं लग्‍न केलं... सगळं केलं माझ्या या लावणीच्‍या मदतीने.'' सुरेखा पुणेकर यांची ही प्रेरणादायी गाथा ऐकून दिगंबर, विद्याधर यांनी या लावणीसमाज्ञीला सलाम केला. 

टॅग्स :बिग बॉस मराठीसुरेखा पुणेकरदिगंबर नाईकविद्याधर जोशी