बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालपासून सदस्यांना भेटायला त्यांच्या परिवरातील सदस्य येत आहेत. काल सगळेच सदस्य खूप भावूक झाले होते. कारण प्रत्येक सदस्याच्या घरातून कोणी ना कोणी येत होते. ते त्यांना सल्ले देत होते, त्यांना प्रोत्साहन देत होते. शिवानीच्या वडीलांनी, नचिकेत म्हणजेच नेहाच्या नवर्याने, हीनाच्या आईने सगळया सदस्यांशी आपुलकीने बातचीत केली. शिवानीने तिने लिहिलेले पत्र तिच्या वडिलांना वाचून दाखवले तर नचिकेतने नेहाचे पत्र वाचले. हीनाच्या वडिलांचा आवाज आला ज्यामुळे तिला अश्रु अनावर झाले पण हीनाची आई घरामध्ये आली आणि हीनाचे अश्रृ थांबायचे नाव घेत नव्हते.
हीनाच्या आईने किशोरी ताईचे आभार मानले कारण त्यांच्या आधारामुळे असे वाटते की हीनासोबत कोणीतरी घरात आहे... विणाला सांगितले कधी कधी राग यायचा पण आता नाही येत नाही असेच एकत्र रहा आणि छान खेळा... त्यांनी रूपालीला विनंती केली की, हीनाला चुकीचे समजू नका, तिला मराठी येत नाही त्यामुळे प्रॉब्लेम आहे पण तिचा हेतु चुकीचा नसतो... नेहाला विचारले आता हीनाशी पहिल्यासारखे का नाही बोलत ? तिला इग्नोर का करतेस ? शिवानीने हीनाच्या आईची माफी मागितली. त्यावर हीनाची आई म्हणाली, इतक हीनाला टार्गेट नका करू, तिच्या इतकं मागे नका लागू... मी कुणालाही चुकीचं म्हणत नाहीये तुम्ही तुमच्या जागी बरोबर असाल पण हीनासोबत इतक चुकीचे नका वागू... जे मनात येत ते बोलतेस मग माफी मागतेस, पश्चाताप मग होतो ना, मग नका वागू अस तिच्याशी... हीनाच्या आईला अश्रु अनावर होत होते... त्यांनी शिवानीला सांगितले जे पण बोलाल ते विचार करून बोला...
शिवच्या आईने त्याला दिला 'हा' मोलाचा सल्ला, वाचा काय आहे सल्ला
घरामध्ये शिव ठाकरेला भेटायला त्याची बहीण मनीषा आणि आई आशा येणार आहेत... घरामध्ये आल्यावर शिवच्या आईने धम्माल आणली. आईला बघून शिव खूप खुश झाला, आईच येणार माहिती होते असेही तो म्हणाला... रूपालीला बोलताना शिवची आई म्हणाली हा बदमाश आहे... शिवशी बोलताना त्या म्हणाल्या किशोरी ताई म्हणतोस तर शिवानी, हीना आणि विणा सर्वच बहिणी आहेत तुझ्या... या वाक्यावर सर्वांना हसू फुटले.... राखी देते बांधुन घे”... आता नक्की त्यांना काय म्हणायचे होते हे जर शिवपर्यंत पोहोचले तर ठीक !