Join us

Bigg Boss Marathi 2: किशोरी शहाणे झाल्या भावूक, हे आहे यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 5:11 PM

स्‍पर्धकांना बिग बॉसच्‍या घरात जाऊन आता दोन महिने उलटून गेले आहेत.

स्‍पर्धकांना बिग बॉसच्‍या घरात आणि आपल्‍या कुटुंबापासून व सामाजिक जीवनापासून दूर राहून आता दोन महिने उलटून गेले आहेत. आपल्‍या प्रियजनांच्‍या आठवणीत वेळोवेळी या उमेदवारांना भावूक होताना आपण पाहिले आहे. वूटच्‍या अनसीन अनदेखाच्‍या नवीन क्लिपमध्‍ये किेशोरी शहाणे विणा जगतापजवळ आपल्‍या स्‍वर्गीय वडिलांबद्दल बोलताना भावूक झालेली दिसत आहे. 

विणा गप्‍पांना सुरुवात करत म्‍हणते, ''ताई तुझ्या मम्मीच्‍या घरी असतो ना गणपती?'' त्‍यावर किशोरी सांगते, ''हो असायचा डॅडी होते तेव्‍हा, डॅडी गेल्‍यानंतर आता नसतो.'' त्‍यावर वीणा किशोरीच्‍या वडिलांबाबत तिला विचारु लागते.''बाबांना जाऊन माझ्या ३ वर्ष झाली, बट आय मिस हिम एव्‍हरीडे, आता सुद्धा!'' भावूक होऊन किशोरी पुढे सांगू लागते, ''त्‍यांचा खूप गायडन्‍स असायचा मला, छोट्या छोट्या गोष्‍टींमध्‍ये पण. त्‍यांना मी कन्‍फ्युज असले आणि प्रश्‍न केला की ते इतके पटकन उत्‍तर देऊन ते दूर करायचे. आपण कितीही मोठे झालो तरी असं फिलिंग असतं ना की कोणीतरी आहे आपल्‍या वरती, आपल्‍याला आशीर्वाद देणारं, गाईड करणारं, कोणाकडे वी कॅन लूक अप टू. ज्‍यांच्‍याकडे जाऊन आपण आपले प्रॉब्‍लेम्‍स सॉल्‍व्‍ह करु शकतो, ज्‍यावर ते काहीतरी असा मार्ग सांगतात की असं वाटतं की हे आपल्‍याला कसं नाही सुचलं.''

किशारी सांगते की, तिचे बाबा तिच्‍यासाठी मार्गदर्शक व मोठं पाठबळ होते. भावूक झालेल्‍या किशोरीला पाहून तिचे सांत्‍वन करत वीणा म्‍हणाली, ''तुला माहित आहे ताई, यू आर अ व्‍हेरी गूड ह्युमन बिंग, खूप छान! ते आहे तुझ्यात मग अफकोर्स तुझ्या वडिलांमध्‍ये जास्‍त असेल म्‍हणून तुझ्यात आहे.''

शंकाच नाही की, किशोरी मनाने खूप चांगली आहे आणि त्‍यासाठीच आपल्‍याला ती खूप आवडते.

बिग बॉस घरातील अशा काही रोचक गोष्‍टी जाणून घेण्‍यासाठी वूटचे अनसीन अनदेखा सीन पहात रहा. 

टॅग्स :किशोरी शहाणेबिग बॉस मराठीवीणा जगताप