बिग बॉ़स मराठी २: रूपालीच्या चाहत्याने लिहिले तिच्यासाठी पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 08:22 PM2019-07-03T20:22:37+5:302019-07-03T20:22:59+5:30
'बडी दूर से आए हैं' आणि 'जबान संभालके' सारख्या हिंदीच्या गाजलेल्या विनोदी मालिकेतून प्रसिद्ध झालेली मराठमोळी अभिनेत्री रूपाली भोसलेचा चाहतावर्ग मोठा आहे.
'बडी दूर से आए हैं' आणि 'जबान संभालके' सारख्या हिंदीच्या गाजलेल्या विनोदी मालिकेतून प्रसिद्ध झालेली मराठमोळी अभिनेत्री रूपाली भोसलेचा चाहतावर्ग मोठा आहे. केवळ हिंदीच नव्हे तर तिने मराठीत 'करून गेलो गाव' हे नाटक आणि अनेक मालिकांमध्ये काम केले असल्यामुळे मराठी प्रेक्षक वर्गातही ती प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे, तिच्या नावाने तिच्या चाहत्यांनी सोशल नेटवर्किंग साइट्सवर अनेक फॅन्स क्लब सुरू केले आहेत.
सध्या रूपाली बिगबॉस मराठी सीजन २ च्या घरात आहे, त्यामुळे बाहेरच्या जगाशी तिचा संपर्क जरी होत नसला, तरी तिचे चाहते विविध प्रकारे तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रयत्न निखिल राणे नामक एका चाहत्याने केला आहे. त्याने रुपालीला पत्र लिहीत, आपल्या भावना व्यक्त केल्या. रूपालीच्या घरच्या पत्त्यावर पत्र पाठवणे शक्य नसल्यामुळे त्याने ते त्याच्या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट केले आहे.
बिग बॉसच्या घरात आतापर्यंत अनेक घडामोडी घडून गेल्या असून, दिवसेंदिवस टास्कदेखील अवघड होत आहेत. रूपालीदेखील आपली खेळी चांगल्याप्रकारे खेळत आहे. बाहेरून तिच्या चाहत्यांचा तिला भरभरून प्रतिसाद देखील मिळत आहे.
बिग बॉसच्या घरात रुपाली भोसले आल्यापासून पराग कान्हेरे तिच्या प्रेमात पडला असल्याचे आपण पाहिले होते. पण त्याच्या प्रेमाला रुपालीने कधीच प्रतिसाद दिला नाही. एवढेच नव्हे तर बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यापासून आपल्या खाजगी आयुष्याविषयी बोलणे रुपाली नेहमीच टाळते. पण आता बिग बॉस मराठीमध्ये तिने सुरेखा पुणेकर यांना तिच्या खाजगी आयुष्याविषयी सांगितले आहे.
सुरेखा यांच्याशी गप्पा मारताना रुपालीने सांगितले की, माझ्या आई वडिलांना सांभाळेल असाच जोडीदार मला हवा आहे. माझे आई-वडील ही माझी प्रायोरिटी आहे. माझ्या भावाने त्यांना सांभाळावे असे मला कधीच वाटत नाही.
माझे लग्न झाल्यानंतर मी काही वर्षं लंडनला होते. पण माझ्यासाठी हा अनुभव अतिशय वाईट होता. मी सात वर्षं खूप काही सहन केले आहे. मी नेहमीच कुटुंब आणि घर सांभाळणारी आहे. पण तरीही मला माझ्या नात्यात सुख मिळाले नाही. त्यामुळे पुन्हा कोणत्याही नात्यात पडताना मी अनेकवेळा विचार करेन. तसेच माझ्या जवळच्या अनेक मैत्रिणींची लग्न होऊन ती तुटलेली मी पाहिलेली आहेत. त्यामुळे मला लग्नाची भीती वाटते. मी पुन्हा कोणत्या नात्यात अडकेल का याविषयी मला देखील माहीत नाहीये.