Join us

Bigg Boss Marathi 2 -या कारणामुळे माधव बिग बॉस मराठी २च्या घरातून बाहेर, शिवानीने हे सत्य केलं उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 13:07 IST

यावेळेस शिवानीने अनेक गोष्टी नेहाला बोलून दाखावल्या, तिला खटकणार्‍या न पटणार्‍या ज्या गोष्टींचा तिला राग येतो त्या सगळ्या तिने इतर स्पर्धकांना सांगितल्या.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रोज नाती बदलताना दिसतात. मित्र कधी वैरी होईल हे सांगता येत नाही. कधी कुठली गोष्ट खटकेल ? कोणत्या बोलण्याचे वाईट वाटेल आणि दुखवला जाईल ? गैरसमज होईल ? हे सांगता येत नाही. काही दिवसाआधी शिवानीने नेहाशी न बोलण्याचा निर्णय घेतला होता. जितकं काम असेल तितकंच बोलायचे जी मैत्री असेल ती बाहेर निभवायची या घरामध्ये नाही. पण, अचानक माधवच्या घरामधून जाण्याने दोघींना खूप मोठा धक्का बसला आणि त्यांनी ठरवले आता भांडायचे नाही, आपण दोघीच  एकमेकांना साथ द्यायची.  

 

मात्र ठरवल्याप्रमाणे तसे काही झालेच नाही. याउलट  या दोघींमधील मैत्री तुटते की काय असे घरात वातावरण निर्माण झाले आहे.  यावेळेस शिवानीने अनेक गोष्टी नेहाला बोलून दाखावल्या, तिला खटकणार्‍या न पटणार्‍या ज्या गोष्टींचा तिला राग येतो त्या सगळ्या तिने इतर स्पर्धकांना सांगितल्या.

दरम्यान शिवानी आणि नेहा मधील वाद वाढतच गेला शिवानी म्हणाली की, तुझ्याकडे बोलायला काही नाहीये. त्यावर नेहाचा आवाज चढला आणि ती म्हणाली “मला माहिती आहे मी काय केलं आहे माझ्या आणि माधवबद्दल तू काही बोलू नकोस. यावर शिवानी म्हणाली, म्हणून तो बाहेर गेला सारखं बोलायला लावलं तू त्याला. रडायच नाटक केलंस, मलाच तुम्ही किती बोलता, माझच कसं खरं आहे, मी किती बिचारी आहे, किती बोलतो मला माधव हे चित्र तू बनवलंस  असे आरोप तिच्यावर लावण्यात आले आहेत. 

टॅग्स :शिवानी सुर्वेबिग बॉस मराठीमाधव देवचक्के