कलाकारांचे आयुष्य हे काही सोपे नसते, कारण ते पडद्यावर बरीच पात्रं जिवंत करत असतात आणि दर्शकांना सर्वोत्तम मनोरंजन देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असतात. कामाप्रती दृढनिश्चयाचे असेच एक उदाहरण आपल्याला बिग बॉसमध्ये दिसून आले, जेव्हा माधवने पडद्यावर स्त्री व्यक्तिरेखा साकारण्याविषयीचा आपला अनुभव सांगितला. वूटच्या अनसीन अनदेखाच्या नवीन क्लिपमध्ये माधव लक्ष्यमधील आपल्या भूमिकेकरिता शॉर्ट ड्रेस व हाय हील्स घालण्याचा आपला बाका प्रसंग सांगत आहे. आपला अनुभव सांगताना माधव म्हणतो, ''लक्ष्यचा एक एपिसोड होता ज्यामध्ये लेडी बनून मी सगळ्या पोलिस वाल्यांचे खून करतो. त्यात ड्रेस घातला होता मी, लाल रंगाचा, आमिर खानने घातलेल्या एका गाण्यात तसा रेड अँड ब्लॅक आणि बहिणीची हील्स घेऊन गेलो होतो'' आणि तो शिवानीच्या हाय हील्सची उंची दाखवतो.
बिग बॉस मराठी २ : माधव सांगतोय पडद्यावर स्त्री पात्र साकारण्याचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 7:19 PM