Join us

बिग बॉस मराठी २ : 'हे' सदस्य झाले घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 8:00 PM

बिग बॉसच्या घरात नुकतेच कुटनीती हे नॉमिनेशन कार्य पार पार पडले.

प्रत्येक आठवड्यात पार पडणाऱ्या नॉमिनेशन टास्कबद्दल सगळ्याच सदस्यांच्या मनामध्ये धास्ती असते ती म्हणजे या टास्कमध्ये कोण कोणाला नॉमिनेट करेल. काल घरामध्ये कुटनीती हे नॉमिनेशन कार्य पार पार पडले. त्यानुसार प्रत्येक सदस्याला चार सदस्यांना योग्य कारणे देऊन नॉमिनेट करणे अनिवार्य होते. 

बिग बॉस हा कार्यक्रम मनोरंजनाची मेजवानी आहे. जे सदस्य या मेजवानीची चव कमी करत आहेत त्यांना घरातील सदस्यांनी या आठवड्यामध्ये नॉमिनेट करायचे होते. सदस्यांचा प्रवास आता अंतिम फेरीच्या दृष्टीने सुरु झाला आहे. त्यामुळे सदस्यांनी प्रत्येक टप्प्यावर त्यांची पात्रता सिद्ध करणे महत्वाचे आहे.

या नॉमिनेशन कार्यामध्ये रुपालीने वीणाला तर हिनाने नेहाला नॉमिनेट केले याचे आश्चर्य सगळ्यांनाच वाटले. रुपालीने वीणाला ओवर कॉन्फिडंट म्हटलं आणि अशा सदस्यांना या घरामध्ये जागा नाही असे देखील तिने स्पष्ट केले. हिनाने देखील तिचे परखड मत मांडले. प्रत्येक सदस्यांनी त्यांना वाटणारी कारणे स्पष्टपणे सगळ्यांसमोर मांडली आणि या आठवड्यामध्ये नेहा शितोळे, किशोरी शहाणे, शिव ठाकरे, वीणा जगताप, वैशाली म्हाडे, हिना पांचाळ आणि माधव देवचके घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले.

आता बघूया या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल ? कोणाला प्रेक्षकांची मते वाचवतील ? हे आगामी भागात स्पष्ट होईल.

टॅग्स :बिग बॉस मराठीहिना पांचाळवीणा जगतापरुपाली भोसले