प्रत्येक आठवड्यामध्ये एका सदस्याला घराबाहेर जाणे अनिवार्य आहे. या आठवड्यामध्ये माधव, हीना, वीणा, नेहा, किशोरी हे सदस्य नॉमिनेट होते. माधव आणि किशोरी डेंजर झोनमध्ये आले आणि माधवला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडावे लागले. शिवानी,हीना आणि नेहाच्या खूप जवळचा मित्र घरामधून बाहेर पडला आणि त्यामुळे या तिघींना अश्रू अनावर झाले. माधवच्या बाहेर जाण्याने नेहा आणि शिवानीला खूप मोठा धक्का बसला.
शिवानी आणि नेहा आता घरामध्ये एकट्या पडल्या आहेत. आज नेहा शिवानीकडे तिचे मन मोकळं करताना दिसणार आहे. या दरम्यान दोघींना अश्रू अनावर झाले. नेहाने शिवानीला सांगितले "माझ्या मनामध्ये कधीच तुमच्याबद्दल वाईट विचार आले नाही". यावर शिवानीने नेहाला सांगितले "आता आपण एकत्र राहायचे आहे, अजिबात भांडायचे नाहीये". शिवानीने नेहाची माफी देखील मागितली आणि तिला सांगितलं कि, मी जर बोलले नसते तर माझ्या मनामध्ये राहिले असते. त्यावर नेहाचे म्हणणे आहे, मला त्या गोष्टीचा राग आला नाहीये, पण मला वाईट वाटले, कारण माणूस म्हणून मी खरंच इतकी वाईट नाहीये, मी गेम वगैरे नाही खेळणार तुमच्यासोबत.
शिवनीचे म्हणणे पडले, मी काहीतरी कारणास्तव सांगत होते कि असं वागणं बंद करा. त्यामागे काहीतरी भक्कम कारण होतं. तो त्याच्या पण कारणामुळे गेला असावा बाहेर पण, काय होत एखादा माणूस चुकीचा दिसायला लागतो, तो मूर्ख होता बोलायचो.नेहाने शिवानीला सांगितले, "मी एका दिवसात दोन माणसं नाही गमावू शकतं".
तसेच बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडल्यावर माधवला आतापर्यंतच्या घरातील प्रवासाची एक सुंदर AV दाखविण्यात आली. "माणूस म्हणून या घरामध्ये खूप छान होतास" तर माधव कधीच डर्टी गेम खेळाला नाही, कधी जास्त दुसऱ्या सदस्यांबाबत बोलला नाही असे महेश मांजरेकर यांनी सांगितले. माधवला एक विशेष अधिकार माधवला दिला, त्याला कोणत्याही एका सदस्याला सेफ करायचे होते आणि त्याने नेहाला सेफ केले.