बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टास्क आणि कॅप्टन बनणे याला महत्व खूप आहे, आणि त्यासाठी सदस्य खूप प्रयत्नात असतात. कॅप्टन बनल्यावर तो सदस्य त्या आठवड्यात नॉमिनेशन पासून सेफ होतो. आता तर सुरेखा पुणेकर यांनीदेखील त्यांना कॅप्टन बनायचं असल्याची इच्छा व्यक्त केली.
काल बिग बॉसच्या घरामध्ये रंगला कॅप्टनसीचा टास्क. या आठवड्यात घराचा कॅप्टन कोण बनणार हे दोन्ही टीमना ठरवायचे होते. आणि त्यासाठी त्यांनी टीम मधून उमेदवार दिले. कॅप्टनसीसाठी नेहाच्या टीम मधून माधव आणि शिवच्या टीम मधून वीणाचे नावं सदस्यांनी घेतले. यावरून दोन्ही टीममध्ये बरीच चर्चा देखील झाली. अभिजीत केळकरचे म्हणणे पडले मला कॅप्टन बनायला आवडेल. कारण ज्यावेळेस माधवला विचारणा झाली तेव्हा त्याला व्हायचे नव्हते. पण अभिजीत केळकर एकदा कॅप्टनसीच्या टास्कसाठी खेळला असून आता माधवला संधी देऊ असे सगळे म्हणाले. आणि यावरच सुरेखा पुणेकर यांचे म्हणणे पडले मला पण कॅप्टन व्हायला नक्कीच आवडेल, माझा विचार कधी केला जाईल ? माधव नंतर माझं नाव असलं पाहिजे. आता बघूया टीम कोणाचं नावं देणार पुढच्या वेळेस.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी टास्क वीणा आणि माधवमध्ये पार पडला. ज्यामध्ये माधवने बाजी मारून घराचा नवा कॅप्टन होण्याचा मान पटकवला. तसेच काल घरामध्ये नॉमिनेशन कार्य देखील पार पडले.
हीनाने शिवला खडसावून सांगितले, पुन्हा असं बोलास तर मी खूप घाणेरड्या शब्दांत उत्तर देणार.'' यावर शिवदेखील तिला म्हणाला तुझ्याशी गंमत नाही केली का मी, माझ्याशी असं बोलायचं नाही." शिव इथेच थांबला नाही तो पुढे म्हणाला, तुला गोष्टी नाही कळत तर मला विचार." शिव असं काय म्हणाला ज्यावरून हीना त्याच्यावर इतकी चिडली ? आता हे भांडण किती विकोपाला जाणार, कोण नमतं घेणार हे कळेल आजच्या भागामध्ये.