अनेक लोक एकत्र आले की भांड्याला भांडं लागणारच, शब्दाला शब्द लागणारच आणि गैरसमज होणारच... त्यात बिग बॉसचे घर म्हटले की हे स्वाभाविकच आहे. कारण वेगवेगळ्या क्षेत्रातील १५ कलाकार एकत्र आले म्हणजे एकमेकांचा स्वभाव समजणे, त्यांच्या सवयी समजून घ्यायला वेळ लागतोच. मराठी टेलिव्हिजनवरील दोन लोकप्रिय अभिनेत्री राधा म्हणजेच वीणा जगताप आणि शिवानी सुर्वे यांचे घरामध्ये तसे चांगले जमत होते. पण आता या दोघींमध्ये वाद होताना दिसणार आहे. आणि हा वाद देखील अभिजित बिचुकले यांच्यावरूनच.
“मला नको सांगूस कसं बोलायचं” असं शिवानीच म्हणणे आहे तर वीणाचा मुद्दा आहे किचनमध्ये आरडाओरडा नको. आता नक्की काय झालं ? वाद मिटणार का ? हे आजच्या भागामध्ये कळेलच. बिग बॉस मराठी सीझन २ सुरु झाल्यापासून अभिजित बिचुकले हे नाव चर्चेत आहे. पण अभिजित केळकर याच्याशी बोलताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी का आले ? त्यांनी कोणत्या गोष्टी सांगितल्या या दरम्यान? हे आजच्या भागामध्ये कळेल.
हे जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी सिझन २ रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.