नवीन टास्क 'पाणी वापरा जपून'मध्ये प्रसिद्ध केव्हीआरपीच्या शो डाऊनसह अनेक आश्चर्यजनक ट्विस्ट्स पाहायला मिळाले. पण वूटच्या 'अनसीन अनदेखा'च्या नवीन क्लिपमध्ये आपल्याला काही वेगळीच खिचडी शिजताना पाहायला मिळेल. स्पर्धक गोव्यामध्ये पराग व रुपालीच्या विवाहाच्या तयारीला लागले आहेत. सुरेखा पुणेकर, किशोरी शहाणे, वैशाली म्हाडे, रूपाली भोसले, शिवानी सुर्वे व नेहा शितोले हे गार्डनमध्ये बसले आहेत. ते रूपालीला परागसोबत विवाह करण्यासाठी मनवत आहेत. सुरेखा ताई रूपालीला चिडवत म्हणतात, ''मी चांगली तयारीत होते की, इथून गेल्यानंतर गोव्याला जायचं लग्नाला. माझी एक आवडती साडी मी आणलेली, पण घातली नाही इथे विचार करून की गोव्याला नेसेन तुझ्या लग्नासाठी!''
बिग बॉस मराठी २ : 'बिग बॉस'च्या घरात सुरू झालीय लग्नाची लगबग, जाणून घ्या कोण आहे हे जोडपं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 16:22 IST