Join us  

Bigg Boss Marathi 3 : अविष्कार दारव्हेकर ‘OUT’, नीथा शेट्टी साळवी ‘IN’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 10:29 AM

Bigg Boss Marathi 3 Elimination : अविष्कार दारव्हेकर बाहेर गेल्यानंतर घरामध्ये दुसरी वाईल्ड कार्ड एंट्री झाली.

बिग बॉस मराठी 3’ची (Bigg Boss Marathi 3) चावडी म्हटल्यावर चाहत्यांना दोन गोष्टींची उत्सुकता असतेच असते. एक म्हणजे महेश मांजरेकरांची ‘शाळा’ अन् दुसरी म्हणजे  बिग बॉसच्या घरातून कोणाचा पत्ता कट होणार हे जाणून घेण्याची उत्कंठा. त्यानुसार, शनिवारी मांजरेकरांनी सदस्यांची चांगलीच शाळा घेतली.  विशाल निकमला त्यांनी खडेबोल सुनावले. यानंतर काल रविवारी बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडणार, याची उत्सुकता होती आणि अविष्कार दारव्हेकर घरातून बाहेर पडला.आविष्कार, स्नेहा, सोनाली आणि गायत्री डेंजर झोनमध्ये होते. या चार जणांमधून अविष्कार दारव्हेकरचा (Aavishkar Darwhekar) बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपुष्टात आला.2004 साली अविष्कारने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. अविष्कारने ‘किरण कुलकर्णी 52 किरण कुलकर्णी’, ‘ती आणि इतर’, ‘देवा शपथ खोटं सांगेन’, ‘आई तुझा आशीर्वाद’, ‘जुईली’, ‘मृत्युपत्र’ अशा चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे.  दुर्वा  मालिकेत  त्याने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. याशिवाय आणखी काही मालिकांमध्ये अविष्कारने भूमिका साकारली आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्य स्नेहा वाघ ही अविष्कारची पूर्वाश्रमीची पत्नी होती.

 

दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्रीअविष्कार घराबाहेर पडला आणि ‘ती’ आत आली. होय, अभिनेत्री नीथा शेट्टी साळवी (Neetha Shetty) हिने बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली. तिच्याआधी आदिश वैद्य हा वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे घरात आला होता. मात्र दोनच आठवड्यांत त्याचा घरातील मुक्काम संपला. आता नीथा घरात आलीये. साहजिकच नीथाच्या घरात येण्याने बिग बॉस मराठीच्या घरातील समीकरण कशी बदलतात, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठी