‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांमध्ये जीवाभावाची नाती बनतात. पण ही नाती तुटायलाही वेळ लागत नाही. ‘बिग बॉस मराठी 3’मध्ये (Bigg Boss Marathi 3) सध्या हेच दिसतंय. बिग बॉसच्या घराचे रूपांतर आता अद्भूत नगरीत झालं आहे आणि दादूस या अद्भूत नगरीचा राजा आहे. अर्थात हा एक टास्क़ या टास्कमध्ये घरातील स्पर्धकांची स्वर्गात वा नरकात रवानगी करण्यात आली. नरकातील रवानगी झालेले स्पर्धक अर्थातच थेट नॉमिनेट झालेत. याच टास्कदरम्यान विकास पाटील (Vikas Patil ) आणि विशाल निकम (Vishal Nikam) यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला आणि विकास ढसाढसा रडताना दिसला.विकास पाटील नरकात जातील. यांना वाटतं तेच खरं तेच योग्य, असं विशाल म्हणाला. यावर हा बालिशपणा आहे, असं विकास म्हणाला. विकासने बालिश म्हणताच, विशाल खवळला आणि तुला मी बालिश दिसतोय? असा सवाल त्यानं केला. या कलगीतु-यानंतर अद्भूत नगरीचा राजा असलेल्या दादूसनी विकासची रवानगी नरकात केली. विशालच्या या खेळीने विकास पाटील चांगलाच दुखावला आणि त्याला अश्रू अनावर झालेत. तो ढसाढसा रडला.बिग बॉसच्या घरात विकास व विशाल यांची मैत्री चांगलीच बहरली होती. पण एका नॉमिनेशन टास्कने या दोन मित्रांची मैत्रीत दुरावा निर्माण केला. आता ही मैत्री तुटणार की राहणार, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.
चाहते म्हणाले, भांडू नका रे...विकास व विशालच्या या भांडणावर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. ‘नाही, हे नाही व्हायला पाहिजे विकास-विशाल. अरे का कळतं नाहीये तुम्हाला... दुसºया टीमला हेच हवं आहे. ते मरू दे. पण तुम्ही असं भांडले तर खरंच वाईट वाटत आहे रे... नका भांडू,’ अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली. काहींनी या भांडणात विकासची बाजू घेत, ‘विशाल, काय हा मूर्खपणा,’ असा जाब विशालला विचारला. ‘विशाल त्या मीराला सपोर्ट करतो आणि तिला सॉरी पण बोलतो आणि स्वत:च्या मित्राला सॉरी बोलायला त्याला लाज वाटते. ती मीरा उभी पण नाही करत,’असं म्हणत एका चाहत्याने विशालला धारेवर धरलं.