‘बिग बॉस मराठी’चं तिसंर पर्व (Bigg Boss Marathi 3) सुरु होऊन आता एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. या एका महिन्यात बिग बॉसच्या घरात अनेक बदल झाल्याचं पाहायला मिळालं. काही स्पर्धकांनी लवकर निरोप घेतला. तर काही स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली. नुकतीच या घरात नीथा शेट्टी-साळवी (Neetha Shetty) या अभिनेत्रीची वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली आहे. त्यामुळे महिन्याभरापासून या घरात वावरत असलेले स्पर्धक तिच्या वागण्याबोलण्याकडे, तिच्या एकंदरीत स्वभावाकडे कटाक्षाने लक्ष देत आहेत. नीथा घरात आली आणि आल्याबरोबर ती कोणत्या टीममध्ये जाणार, याची उत्सुकता वाढली होती. पण आता हीच नीथा रडताना दिसली आणि तिला रडताना बघून चाहत्यांनी तिची जबरदस्त फिरकी घेतली.होय, बिग बॉसच्या नाही जमतंय मला, मी अशी नाहीये यार..., असं म्हणत नीथा ढसाढसा रडली. मीनल आणि सोनालीसमोर मन मोकळं करताना तिला अश्रू आवरता आले नाहीत. मला भांडता येत नाही यार.. तुम्ही त्याबाबतीत खूप स्ट्राँग आहात, व्होकल आहात... पण मला नाही जमतंय यार... मी असं कधी केलं नाहीये यार.. नाही जमत आहे मला, असं नीथा म्हणते. यावर सोनाली आणि मीनल तिला समजवताना दिसतात.
चाहते म्हणाले, अंग नीथा तू घरी जा...नीथाला रडताना पाहून चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिली आहे. अंंग नीथा तू घरी जा, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे. नीथाला सहानुभूती द्या रे..., अशा शब्दांत एका चाहत्याने तिची मजा घेतली आहे. हिला आणण्यापेक्षा आदिशला आणायला हवे होते. यायच्या आधी माहित नव्हते का बिग बॉस, अशी कमेंट एका युजरने केली आहे. ये बाई किती रडतेय ही. जेवढं खेळताना दिसली नाही तेवढी रडताना दिसली, अशी कमेंट एका युजरने केली.