बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व सुरु होऊन आता बरेच दिवस लोटले आहेत. अक्षय वाघमारेनंतर आता सुरेखा कुडचीदेखील या पर्वातून बाहेर पडली आहे. त्यामुळे आता घरात १३ स्पर्धक राहिले आहेत. विशेष म्हणजे आता हे तेराही जण हे पर्व जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यामुळे घरात अनेकदा वादविवाद, भांडणं,मतभेद रंगल्याचं पाहायला मिळतं. त्यातच आता मिनल आणि आदिशमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. आजच्या भागात या दोघांचं जोरदार भांडण होताना दिसणार आहे.
एका टास्क दरम्यान या दोघांमध्ये भांडण होणार असून दोघंही एकमेकांना नीट वागण्याची तंबी देणार आहेत. काही गैरसमजातून या दोघांमध्ये वाद होणार आहे. त्यामुळे हा वाद सोडवण्यासाठी विशालदेखील मध्यस्थी करणार आहे. मात्र, हे दोघही कोणाचं ऐकून घेण्यास तयार नसल्याचं पाहायला मिळेल.
“माझ्याशी नीट बोलायचं. मी तुला म्हणाले, हीच वेळ आहे बोलूया. माझ्याशी असं बोलायचे नाही. DO NOT Talk to me like that, मी व्यवस्थित बोलते आहे तुझ्याशी. तू नीट बोल मी पण नीट बोलेन”, असं मिनल आदिशला सांगते. त्यावर, "आता नाही बोलायचे डोन्ट इन्स्टिगेट. तिला सांग ओरडा ओरड करु नकोस”, असं आदिश म्हणतो.
दरम्यान, विशाल मिनलची बाजू घेतोय असा गैरसमज आदिशच्या मनात निर्माण होणार आहे. त्यावर, " मी कोणाच्या बाजूने नाही. मी सत्याच्या बाजूने आहे". परंतु, हा वाद नेमका कोणत्या टास्कमुळे सुरु झाला हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.