‘बिग बॉस मराठी 3’ची (Bigg Boss Marathi 3)चावडी म्हणजे काय तर स्पर्धकांची शाळा. होय, नेहमीप्रमाणे काल शनिवारी रंगलेल्या बिग बॉसच्या चावडीवर (Bigg Boss Marathi 3 Chavadi) महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) स्पर्धकांची शाळा घेताना दिसून आलेत. बॉसच्या घरात मागच्या आठवड्यात अनेक गोष्टी घडल्या. आदिश वैद्यला घराचा निरोप घ्यावा लागला. त्यानंतर बिग बॉसच्या घराचे रुपांतर अद्भूत नगरात झाले. त्यात बिग बॉसने स्पर्धकांना ‘स्वर्ग की नरक’ हे नॉमिनेशन कार्य दिले होते. या नॉमिनेशन कार्यादरम्यान घरात जोरदार राडा पाहायला मिळाला. विशाल निकम (Vishal Nikam)आणि विकास पाटील (Vikas Patil)या दोन मित्रांमध्ये चांगलाच वाद झाला.
त्यानंतर घरातील स्पर्धकांना बिग बॉसने ‘संयमाची ऐशीतेशी’ हे साप्ताहिक कार्य दिले होते. या टास्कमध्ये स्पर्धक राक्षस आणि देवदुताच्या भूमिकेत होते. या टास्कदरम्यानही विशाल कमालीचा अॅग्रेसिव्ह झालेला पाहायला मिळाला. विशाल व विकास पुन्हा एकमेकांसोबत भिडले. मांजरेकरांच्याच शब्दांत सांगायचं तर मागच्या आठवड्यात देवदूत आणि राक्षकांसोबतचा दंगा, विशाल आणि विकासचा पंगा पाहायला मिळाला. दिवाळीच्या दिवसांत माणसं जवळ येतात, पण या आठवड्यांत जवळची माणसंच दूर जाताना दिसली. खतरनाक स्ट्रटेजी आणि अनावश्यक एनर्जी दिसली. याचा हिशेब चुकता करण्यासाठी महेश मांजरेकरांची चावडी रंगली आणि यावेळी त्यांनी विशालची चांगलीच शाळा घेतली. देवदूत आणि राक्षस या टास्कमध्ये विशाल विकाससोबत जे काही वागला त्यावरून मांजरेकरांनी विशालला चांगलंच फटकारलं.विशाल तुला काही प्रॉब्लेस झाला होता का त्यादिवशी, काही मानसिक? तुझ्या चेह-यावर ना वेडेपणाची झाक होती. तू विकासला जे काही करायला लावत होतास. ते बाहेर खूप भीषण दिसलं, भीषण..., अशा शब्दांत मांजरेकांनी विशालचा क्लास घेतला.