‘बिग बॉस मराठी 3’च्या (Bigg Boss Marathi 3 ) चावडीवर काय होणार? याची उत्सुकता असतेच. कालही चावडी रंगली आणि अपेक्षेप्रमाणे महेश मांजरेकरांनी (Mahesh Manjrekar) एकएकाचा क्लास घेतला. या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरात एक ना अनेक राडे झालेत. जय आणि विकास यांच्यात जोरदार भांडण झालं, गायत्रीला टास्कदरम्यान दुखापत झाली आणि टीम एने त्याचं भांडवल केलं. विशेषत: स्रेहा वाघ (Sneha Wagh) हिने विकासने धक्का मारला म्हणत घर डोक्यावर घेतलं. मग काय, मांजरेकर जाम भडकले. त्यांनी स्नेहाला चांगलंच सुनावलं.‘स्रेहा पण तिकडे होती, पण तिने इश्यू बनवला. मी सांगतेय की विकास धक्का मारतोय, असं स्रेहा म्हणाली. आम्हाला दिसत नाही का? चोरून धक्का मारतो का?तुम्ही काय दिवे लावता ते सगळं दिसतं आम्हाला. तुमचा हेतू काय, हे आम्ही सगळं बघत असतो...,’ अशा शब्दांत मांजरेकरांनी स्रेहाची शाळा घेतली.
जयलाही खडसावलं...मी विकासला दरवेळेला वाचवतो, असं जय म्हणताना दिसला. यावरून मांजरेकरांनी जयचीही शाळा घेतली. तु विकासला वाचवतो म्हणतो, तुझ्यात आहे का ताकद कोणाला वाचवण्याची. पुढच्या वर्षी असा जाशील रे असा...कोण बाहेर जातो, हे ठरवण्याचे अधिकार तुम्हा कोणालाही दिलेले नाहीत, अशा शब्दांत मांजरेकरांनी जयला फटकारलं.
चाहते म्हणाले... महेश मांजरेकरांनी सुनावल्यानंतर स्रेहाची बोलती बंद झाली. चाहत्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. ही सारंगी भाभी दर वीकला तेच ते रिपीट करते, असं एका चाहत्याने लिहिलं. स्रेहा रडू नको आता... रडू बाई कुठली... सारखी रडते, अशी कमेंट एका युजरने केली. ही स्रेहा अशी आहे ना, ‘मी नाही त्यातली कडी लाव आतली’. तोंड बघा जसं हिला काय माहित नाही कशाबद्दल बोलत आहेत मांजरेकर सर. मांजराला वाटत असतं आपण डोळे मिटून दूध पीत आहे म्हणजे आपल्याला कोण बघत नाही. पण तसं नसतं, अशी कमेंट एका युजरने केली.