बिग बॉस मराठीच्या घरामध्ये “जपून दांडा धर” हे साप्ताहिक कार्य सध्या सुरू आहे. ज्यामध्ये काल बराच राडा झाला. गायत्री, नीथा, स्नेहा, विकास आणि दादूस हे कार्यामधून बाहेर पडले. आज कार्यामध्ये काय काय घडणार ? कोण बाहेर पडणार ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. मीरा, नीथा, विकास आणि गायत्री यांनी काल टास्क चांगलाच गाजवला.
आज उत्कर्ष, विकास, विशाल, जय हे प्लॅनिंग करताना दिसणार आहेत. कोण कोणता दांडा पकडणार, कुठला दांडा बाद करायचा आणि कुठला दांडा काढणे फायदेशीर आहे ? यावर यांची चर्चा बरीच रंगली. बघूया या टास्कमध्ये आज काय होणार ? कोण ठरणार कॅप्टन्सीचे दोन उमेदवार. काल गायत्री आणि मीराची उत्कर्षसोबत टास्क दरम्यान वादावादी झाली. गायत्रीच्या सांगण्यावरुन मीराने उत्कर्षवर आरोप केला ज्यावर उत्कर्षला दोघींचा राग आला विश्वास असणे अत्यंत महत्वाचे आहे.
मीनल आणि सोनाली आज जपून दांडा धरा टास्कबद्दल चर्चा करताना दिसणार आहेत. ज्यामध्ये सोनालीला जयची कुठेतरी भीती वाटते आहे असे दिसून येते आहे. सोनाली मीनलला सांगताना दिसणार आहे, “हा म्हणत होता की मला कॅप्टन नाही व्हायचं आहे, कुठेतरी त्यांना असं वाटतं आहे की मुला मुलांमध्ये जे काही होईल... पण कुठेतरी त्याने टेंशन घेतला आहे. मीनलचे म्हणणे आहे, प्रॉब्लेम कुठे होतो जिथे जय, उत्कर्ष आणि विशाल, विकास येणार तिथे ते म्हणणार आपण खेळुय आणि नंतर बघूया... पण शेवटी ते दोघे या दोघांवर गेम करतात.
सोनालीचे म्हणणे आहे, “मी विशालला सांगितले समजा तू, जय आणि उत्कर्ष राहिलात तर एका पोलवर तू आणि जय पडू नका. कारण मग जय उंची वापरुन किंवा अजून काहीतरी वापरुन स्ट्रॅटजी करणार, आणि उत्कर्ष जाणार त्याच्या पोलवर. म्हणजे ही दोघं नको राहायला. शेवटी कोणते दोन सदस्य रहाणार कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी, त्यासाठी आजचा भाग पहावा लागेल.